सुर्याचेही तेज लाभले महाराष्ट्री एक तारा ,
स्वाभिमान जागा केला त्याने पावन झाली धरा .
स्वराज्याचे अमर तोरण पराक्रमाच्या गाथा ,
शिवबाचा गौरव जगती ताठर होते माथा .
गनिमालाही घाम फुटे उतरून सारा तोरा ,
स्वाभिमान जागा केला त्याने पावन झाली धरा .
चंद्रकला ही वाढत जावी विश्ववंदिते आज ,
डोंगरदऱ्या हर्षित होती गडकोटांचा साज .
सह्याद्रीचा मुजरा झडतो कीर्ती वाहतो वारा ,
स्वाभिमान जागा केला त्याने पावन झाली धरा .
तलवारीच्या टोकासवे नियोजनाची भरती ,
विचाराची मशाल हाती भय कुणाचे उरती .
जनकल्याणाचा मंत्र सांगतो कोंदनातला हिरा ,
स्वाभिमान जागा केला त्याने पावन झाली धरा .
मुजोरी ते वतन सारे वठणीवरती आले ,
आदर्श घालुनी न्यायाचा शिवछत्रपती चाले .
संविधानी तत्त्व नांदते वंदन करितो शुरा ,
स्वाभिमान जागा केला त्याने पावन झाली धरा .
🙏लक्ष्मण खोब्रागडे🙏
जुनासुर्ला , ता. मूल , जि. चंद्रपूर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.