October 9, 2024
Peacock dance in Mango Garden special article
Home » Privacy Policy » नाच रे मोरा आंब्याच्या वनात..!
मुक्त संवाद

नाच रे मोरा आंब्याच्या वनात..!

हातकणंगले ( जि. कोल्हापूर ) सोडलं की कोयना एक्सप्रेस निमशिरगावमध्ये थांबते. याचं बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटतं ? फक्त चार जण उतरतात. कसलीही इमारत नाही. कोणी प्रवासी चढत नाही तरीही कोयना एक्सप्रेस थांबते. सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का बसतो. आता गाडी थोडी पुढ आली की ब्रिज साठी केलेला भराव एका टेकडीसारखा दिसतो. तिथ दररोज मोर दिसतात. कधी पळणारे तर कधी क्वचितच पिसारा फुलवणारे पण दररोज दिसतात. लहान मुलांना मोर दिसला की मुलांच्या आनंदाला उधान येतं.
” डॅडी.. डॅडी.. मोर.. मोर…!”
डब्यातले बरेच जण उजवीकडे बघतात. “मम्मा, मोर..मोर.. ” तोपर्यंत मम्माच इंग्लिश उफाळून येतं.(माझा इंग्रजीला अजिबात विरोध नाही. उलट मराठी पोरांनी दिल्लीचा मीडिया इंग्रजीतून गाजवावा हे माझं स्वप्न आहे.)
” बेटा हा एस एस पीकॉक.. पीकॉक”
मला लवकर करंटच आला नाही. मग बी.डी.ओ. बापू आठवले. पीकॉक… पि….कॉक.. स्पेलिंग नाही आलं की लांब छडीने डोक्यात टंनकण मारायचे. मग कळलं ती बाई मोर या सुंदर शब्दाऐवजी त्याला पीकॉक म्हणायला सांगते. तिचा नवरा “हो.. हा.. बेटा एस.. एस.. पीकॉक”.
मग मोरावरनं चर्चा सुरू झाल्या. आमच्या एका सहप्रवाशाला राहवलं नाही.
” मॅडम इथे रोजच मोर दिसतात” मॅडमनी लगेचच रिप्लाय दिला… मोरावरनं आठवलं आम्ही प्ले ग्रुपला असताना एक छानसं सॉंग होतं. आय थिंक ते मराठीत होतं…. माझ्या मनातला मोर नाचू लागला. “नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच” “काळा काळा कापूस पिंजला रे…ढगांशी वारा झुंजला रे.. आता तुझी पाळी वीज देते टाळी.. फुलव पिसारा नाच… नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच”.
त्या बाईचं व तिचा नवरा जो अर्धी चड्डी व टी-शर्ट घालून प्रवास करत होता. गंमत वाटली. फॉरेनवरून हे लोन भारतात आलं. प्रवासात बर्मुडा टी-शर्ट घालायच. फॉरेनर ची उंची, त्यांचा रंग, त्यांचे केस शोभतं त्यांना. टी-शर्ट बर्मुडा प्रवासात. आपल्या कोयनेतले शहरात जाणारे हे अवलिया पाहिले की (बियर्स)ची आठवण येते. बरमूडावर टी-शर्ट बघून कसनुस वाटतं. पण पर्याय नाही. जे शोभेल ते करावं माणसानं. जाऊदे विषय नको तिकडे निघाला. “मम्मा काय सॉंग होतं ग ते? तो छोटा कुरकुरे खात मम्माला विचारत होता. हा.. एस.. बेटा..बेटा.. पीकॉक डान्स इन द गार्डन ऑफ मॅंगो… बहुतेक इन मराठी.. नाच रे मोरा.. असंच काहीतरी होतं…. आय फरगेट दॅट सॉंग… मला सहन होईना मी माझं बोचकं… घेऊन मागच्या डब्यात गेलो.

रवी राजमाने


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading