कसे विसरू गतवर्षाला…
कसे विसरू मी
त्या गत वर्षाला
पावसात झालेल्या त्या
तुझ्या पहील्या स्पर्शाला…..
आनंद त्या स्पर्शाचा मला
शब्दात सांगता येणार नाही
सुगंध त्या प्रेमाचा माझ्या
आयुष्यातून जाणार नाही….
तुझं हसत येणं अन रागात जाणं
आजही मला आठवते
जवळ नसूनही तू मला
जवळ असल्या सारखी वाटते…..
नविन वर्षात जगण्यासाठी
आता काहीच ऊरलं नाही
गतवर्षी पेरलेलं धान्य
अजून थोडंही ऊगलं नाही….
कवी- संजय बुऱ्हाडे