पणुंब्रे वारुण – शिराळा तालुका डोंगरी साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पणुंब्रे वारुणच्या वतीने राज्यस्तरीय डोंगरी साहित्य पुरस्काराची घोषणा परिषदेचे अध्यक्ष कवी वसंत पाटील यांनी केली.
पद्य विभागातून कवितासंग्रहासाठी दिला जाणारा शब्दरंग उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार कवठेमहंकाळ येथील कवयित्री प्रा. मनिषा पाटील हरोलीकर यांच्या “नाती वांझ होताना “या कविता संग्रहास तर उद्योजक बळीराम पाटील चरणकर उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कार भाऊसाहेब मिस्त्री, सांगवी बाजार जि. छत्रपती संभाजीनगर यांच्या ” रंधा” या कादंबरीस जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, सन्मानचिन्ह, रोख रक्कम असे आहे.
तसेच प्रगतील शेतकरी कै.रावजी निवृती डफळे स्मृती विशेष पुरस्कार कवी मुकुंद वलेकर यांच्या “शिवार माती डॉट कॉम.या कवितासंग्रहास तर सामजिक कार्यकर्ते तानाजी पाटील विशेष पुरस्कार सुभाष ढगे-पाटील इस्लामपूर ता.वाळवा यांच्या ” लढवय्या “या चरित्र ग्रंथास जाहीर झाला आहे.
२२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या १२व्या डोंगरी साहित्य संमेलनात मान्यवरांचे हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी उपाध्यक्ष हणमंतराव पाटील, सचिव मन्सूर नायकवडी, कोषाध्यक्ष सचिन पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.