October 4, 2023
Fulbaja by Rajan Konawadekar
Home » लबाड लांडगं…
व्हायरल

लबाड लांडगं…

राजन कोनवडेकर यांचा फुलबाज्या…

लोका सांगे…

हिस्रस्वापदांना म्हणतात
जरा वागा सरळ |
सापा परास विषारी
नेतेच ओकतात गरळ ||

राजन कोनवडेकर

ढोंग…

व्यासपीठावरुन एकमेकांची
उणी दूणी काढत असतात |
मारेकरीच लोकशाहीचे
गळा काढून रडत असतात |

राजन कोनवडेकर

लबाड लांडगं…

राजकारणातले साधू संतही
सत्तेचे असतात भिकारी |
हजर उंदीर खाऊन म्हणतयं
लबाड मांजर शाकाहारी ||

राजन कोनवडेकर

केवळ सूड…

ईडी फिडी चौकशीचे
किती धडे गिरवायचे |
किती दिवस थांबायचे
हे पावण्यानीच ठरवायचे ||

राजन कोनवडेकर

Related posts

राजकिय फुलबाज्या

दहीहंडी

विविध प्राण्यांचे सहजपणे हुबेहुब आवाज काढणारी प्रयोगभूमीतील मंगल…

Leave a Comment