नद्यांमधील क्रूझ पर्यटनाला चालना देणार -केंद्रीय पर्यटन मंत्री जी.किशन रेड्डी
आपल्या देशाला अपार क्षमता असलेल्या अत्यंत सुंदर अशा नद्या लाभल्या आहेत, या नद्यांमधील क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने विविध उपक्रम हाती घेतले आहेत असे , केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि ईशान्य प्रदेशा विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले.
केंद्र सरकारचे बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय आणि फिक्की अर्थात भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ यांनी संयुक्तपणे मुंबईत आयोजित केलेल्या अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषदेत ‘ नद्यांमधील क्रूझ सेवेची क्षमता ‘ या विषयावरील सत्रात ते बोलत होते.
भारतात मोठी क्षमता असून त्याला आता तरुणाईच्या क्षमतेची जोड मिळाली आहे याचा उपयोग करत विविध विभागांना संलग्न करून पर्यटनासाठी गतीशक्तीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा उभारणार असल्याचे रेड्डी यांनी सांगितले.संपूर्ण देशांतर्गत जलमार्गांमधील क्रूझ सेवेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने नदी क्रूझ सेवेसाठी मार्गदर्शक कृती आराखडा करण्याचे आणि गुंतवणूक करण्याचे आवाहन त्यांनी सर्व संबंधितांना केले. नदीमधील क्रूझ सेवेचा अनुभव आजूबाजूला असलेल्या निसर्गाची अनुभूती देईल असे ते म्हणाले.
गेल्या सहा महिन्यात भारतात देशी पर्यटकांची संख्या वाढली आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांबरोबरच देशांतर्गत पर्यटकांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असून देशाचे आगामी सर्वंकष राष्ट्रीय पर्यटन धोरण सर्व भागधारकांना सामावून घेत या क्षेत्रातील चांगल्या समन्वित विकासाचा मार्ग मोकळा करेल, असे रेड्डी यांनी सांगितले.
समुद्रकिनारा पर्यटन, द्विपगृह पर्यटन आणि क्रूझ पर्यटन यांद्वारे देशातील नदी आणि सागरी किनारी पर्यटनाला चालना दिल्याने मच्छीमार समुदायांना उपजीविकेच्या अन्य पूरक संधी उपलब्ध होतील असे मंत्री म्हणाले.
भारताच्या आगामी जी- 20 अध्यक्ष पदाच्या काळात भारतात अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा होणार असून टेन्ट सिटी आणि इतर सुविधांसारख्या तात्पुरत्या पायाभूत सुविधांची निर्मिती करून त्या काळात विविध भारतीय स्थळांचे योग्य ब्रँडिंग करून या संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे असे त्यांनी सांगितले
आठ सामंजस्य करारांवर झाल्या स्वाक्षऱ्या
परिषदेत केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि जी. किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत एकूण आठ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यात नद्यांमधील क्रूझ सेवेसाठीच्या तीन करारांचा समावेश आहे.
भारत-बांग्लादेश प्रोटोकॉल मार्गांतर्गत कोलकाता मार्गे, उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि आसाम मधील दिब्रुगड येथील बोगीबील दरम्यान नदी क्रूझ सेवेसाठी आणि केरला बॅकवॉटरमध्ये दीर्घ पल्ल्याच्या क्रूझ विकसित करण्यासाठी हे तीन सामंजस्य करार करण्यात आले.
आठ सामंजस्य करार :
1. आगामी समुद्रपर्यटन हंगामासाठी मुंबई येथे क्रूझ जहाज उभे करण्यासाठी मुंबई बंदर आणि आंग्रिया सी ईगल लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार
2.आगामी समुद्रपर्यटन हंगामासाठी चेन्नई येथे क्रूझ जहाज उभे करण्यासाठी मुंबई बंदर आणि जलमार्ग लेझर टूरिझम पी. लि.यांच्यात सामंजस्य करार
3 .क्रूझ जहाजासाठी सागरी प्रशिक्षण क्षेत्रात विद्यमान सेवा प्रदाता म्हणून भारतीय सागरी दृष्टिकोन 2030 ला पाठबळ देण्यासाठी भारतीय नाविकांची भरती करण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने, मुंबई बंदर आणि प्रशिक्षण जहाज रहमान यांच्यात सामंजस्य करार
4. भारतातील क्रूझ संचालकाला सुमारे 600 नाविकांसह प्रदान केलेल्या विद्यमान सेवेसाठी *मुंबई बंदर आणि अपोलो ग्रुप अमेरिका यांच्यात सामंजस्य करार
5.आगामी समुद्रपर्यटन हंगामासाठी चेन्नईमध्ये क्रूझ जहाज उभे करण्यासाठी करण्यासाठी चेन्नई बंदर आणि जलमार्ग लेझर टुरिझम पी. लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार
6. भारत-बांग्लादेश प्रोटोकॉल मार्गांतर्गत कोलकाता मार्गे वाराणसी (उत्तरप्रदेश ) आणि बोगीबील (दिब्रूगड, आसाम) दरम्यान नदी क्रूझ सेवेसाठी भारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरण आणि अंतरा लक्झरी रिव्हर क्रूझ यांच्यात सामंजस्य करार
7. केरला बॅकवॉटरमध्ये दीर्घ पल्ल्याच्या क्रूझ सेवा विकसित करण्यासाठी (एनडब्ल्यू -3).भारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरण आणि साहसी रिसॉर्ट् आणि क्रूझ यांच्यात सामंजस्य करार
8.भारत-बांग्लादेश प्रोटोकॉल मार्ग अंतर्गत कोलकाता मार्गे वाराणसी आणि बोगीबील दरम्यान क्रूझ सेवेसाठी भारतीय देशांतर्गत जलमार्ग प्राधिकरण आणि जेएम बॅक्सी रिव्हर क्रूझ यांच्यात सामंजस्य करार
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.