नाशिक शहरातील साहित्य क्षेत्रात अग्रेसर असलेल्या साहित्यकणा फाउंडेशन संस्थेच्या यंदाच्या नवव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी युवा साहित्य अकादमी विजेते ऐश्वर्य पाटेकर यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय द. गोराडे दिली.
ऐश्वर्य पाटेकर यांच्या भुईशास्त्र या पहिल्याच कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा पहिला युवा पुरस्कारसह अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या ‘जू’ या आत्मकथन पर कादंबरीलाही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पुणे विद्यापीठाच्या एफ वाय बी ए च्या अभ्यासक्रमात मायमाती तर बालभारती इयत्ता आठवीच्या पुस्तकात असा हा रंगारी कवितेचा समावेश आहे. तसेच भुईशास्त्र कवितासंग्रहावर अनेक संशोधन झालेले असून विविध भाषांमध्येही अनेक कविता भाषांतरीत झालेल्या आहेत.
१२ फेब्रुवारीला समर्थ मंगल कार्यालय, कॅनडा कॉर्नर, डोंगरे वसतिगृह, नाशिक येथे एकदिवसीय राज्यस्तरीय साहित्यकणा संमेलन होणार असल्याचे सचिव विलास पंचभाई यांनी जाहीर केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.