📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 22, 2026
काय चाललयं अवतीभवती

झाडीबोली शब्दकोशाचे चंद्रपुरात प्रकाशन

Publication of Zadiboli dictionary in Chandrapur
  • झाडीबोली शब्दकोश महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनमोल ठेवा – ज्येष्ठ साहित्यिक नामदेव माळी
  • झाडीबोली शब्दकोशाचे चंद्रपुरात प्रकाशन

महाराष्ट्राच्या पूर्व भागात चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यात व त्याच्या सीमावर्ती भागात झाडीबोली बोलली जाते. या बोलीतील शब्द महाराष्ट्राच्या संस्कृतीत उजेडात आणण्यासाठी अरुण झगडकर आणि लक्ष्मण खोब्रागडे यांनी चार वर्षे संशोधन करून झाडीबोली शब्दकोश तयार केला. त्या शब्दकोषाचे प्रकाशन चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे , पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक नामदेव माळी पुणे, राज्यस्तरीय मार्गदर्शक माजी विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे सातारा व चंद्रपूरचे उपशिक्षणाधिकारी श्रीनिवास कांबळे, विस्तार अधिकारी धनराज फटींग यांचे हस्ते करण्यात आले.

हा शब्दकोश महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनमोल ठेवा असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक नामदेव माळी यांनी सांगितले. सर्वांनी या क्षणाचे साक्षीदार झाल्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी अरुण बावणे, निखिल तांबोळी, संगीता मॅडम, प्रशांत भंडारे , डॉ. अल्का ठाकरे, विजय भोगेकर व जिल्हाभरातील शेकडो शिक्षक उपस्थित होते .

Related posts

साखरप्याची बाजारपेठ पुरमुक्त…!

ट्रायच्या नावाने फसवणूक

जैतापूर अणूउर्जा प्रकल्पाला विरोध कशासाठी ?

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406