डाॅ. प्रतिमा इंगोले ह्यांनी लिहिलेला कविता संग्रह “सातबारा” शेतकरी स्त्रीच्या जगण्याचा व असण्याचा वेध घेणारा आगळा कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. ह्या संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका सुप्रिया अय्यर ह्यांचे हस्ते नागपूरला झाले.यावेळी नीता खोत, मृगा पागे व हेमा नागपूरकर तसेच कवयित्री प्रतिमा इंगोले उपस्थित प्रामुख्याने होते. लेखिका संमेलनाचे औचित्य साधून हे प्रकाशन करण्यात आले. यातील ही कविता….
सातबारा शेतकऱ्याची बाई तिला मुलखाची घाई हे कर ते कर... सगळे कस्टाचे डोंगर उपसते बिचारी कमरेवर हात ठेवून जगत असते दैवावर हवाला ठेवून.... घर नवऱ्याचं... दार नवऱ्याचं... शेतीवाडी नवऱ्याची मुलंबाळं तीही नवऱ्याची कळणाकोंडा खात जगत असते.... शेतकऱ्याची बाई घरातलं दारातलं वर शेतातलं निपटते शेतकऱ्याची बाई गोल गरगरीत कुंकू तिच्या कपाळावर तर चिरेचचिरे तिच्या खडबडीत तळहातावर ! पण हातात तिच्या काही काहीच नाही वर सातबारावर तिचं नाव तेही नाही... कवयित्री - प्रतिमा इंगोले
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.