September 24, 2023
Sonamukhi Medicinal Plant
Home » सोनामुखी (ओळख औषधी वनस्पतीची)
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सोनामुखी (ओळख औषधी वनस्पतीची)

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये सोनामुखी या वनस्पतीबद्दल माहिती…

– सतिश कानवडे

संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल – 9850139011,9834884804

वनस्पतीचे नाव- सोनामुखी

वनस्पतीचे वर्णन-

केग्युमिनोशी या वनस्पती कुलातील व ६० ते ८० सेटीमीटर वाढणारी झुडूप प्रकारात मोडणारी द्विदल वनस्पती आहे.

औषधी उपयोग

औषधे बनविण्यासाठी प्रामुख्याने वाळलेल्या पानांचा व रोगांचा उपयोग करतात. यामध्ये सेनोसाईड अ-ब-क-ड असून याचा उपयोग आयुर्वेदाबरोबरच युनानी व अॅलोपेथी औषधामध्ये केला जात आहे. सोनामुखीचा स्वाद कडवट, चिकट व उत्तेजक आहे. पचनशक्ती वाढवणे, भूक वाढवणे, पोट साफ होणे व चेहऱ्यावरील मुरूम तसेच मोठ्या पेशी मधील वायू दूर करण्यास उपयोगी आहे.

हवामान व जमीन

उष्ण व समशीतोष्ण हवामानात हे पिक चांगले येते. हलक्या मुरमाड व पडीक व निचरा होणाऱ्या जमिनीत चांगले येते.

लागवड

सुधारित वान- A L T F 2 त्रिकनेली सेना व सोना याचा लागवडीसाठी वापर करावा. हेक्टरी जमिनीसाठी १५ किलो बियाणे आवश्यक आहे. पाण्याची सोय असेल तर वर्षभर लागवड करता येते.

खते

पेरणीवेळी २५ किलो नत्र व ४० किलो स्फुरद द्यावे. पेरणीनंतर पहिल्या व दुसऱ्या महिन्यानंतर २५ किलो नत्र द्यावे. आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

काढणी/उत्पन्न

झाडावर ८० ते ९० दिवसांनी पाने कापणीसाठी तयार होतात. जमिनीपासून ८ ते १० सेमी. अंतराने कापणी करावी. रोपे उपटली जाणार नाहीत. याची काळजी घ्यावी. वर्षभरात ४ कापण्या कराव्या. पाने सावलीत वाळवावीत. प्रती हेक्टरी १५ ते २० क्विटल पाने व ४ ते ५ क्विंटल शेंगा मिळतात. पाने ३० ते ६० रुपये किलो तर शेंगा ५० ते ६० रुपये किलो दराने विकली जातात.

Related posts

शेतकरी संघटना अन् मराठी साहित्याचे अनुबंध

ग्रामीण साहित्याची वस्तूनिष्ठ मांडणी

हवामान बदल चळवळीविषयी सार्थक संवाद सुरु करण्याचा हाऊ टू ब्लो अप अ पाईपलाईन मधून प्रयत्न

Leave a Comment