23.4 C
Maharashtra
September 21, 2021
Future of Gor Boli Language of Bajara Community
Home » गोर बोली भाषा संवर्धनाची गरज
काय चाललयं अवतीभवती विशेष संपादकीय

गोर बोली भाषा संवर्धनाची गरज

बंजारा क्रांती दलाने बंजारा समाजाला संपूर्ण भारतात सन्मान संघटनात्मक सवलती मिळाल्या पाहिजे, अशी भूमिका जाहीर केली परंतु बंजारा समाजाला सन्मान संघटनात्मक सवलती मिळवून देणे व गोरबोली टिकून ठेवणे हे सर्वच बंजारा संघटनेचे मुख्य ध्येय असले पाहिजे, नाहीतर गोरबोली नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.

याडीकार पंजाब चव्हाण

पुसद

महाराष्ट्र बंजारा समाज कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र सरकारला जनगणना २०११ मध्ये बंजारा समाजाची मातृभाषा म्हणून प्रपत्रात गोर बोलीभाषा भरावी अशी विनंती सरकारला केली याबाबत तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रभर प्रमुख वृत्तपत्रात बातम्या झळकल्या आणि विसरल्या गेल्या. या सूचनेला महाराष्ट्र सरकारने कोणती भूमिका घेतली यासंबंधी मात्र काहीही अजून प्रसिद्ध झालेले नाही. मंत्रालयात चौकशी केली तर या विषयावर बोलायला कोणी तयार नाही मुंबईतील गोरबोली.

भविष्याचा विचार करणे सर्वच बंजारा नेतेमंडळींना अडचणीचे झाले आहे. ५ जानेवारी २००३ च्या भव्य मोर्चाच्या प्रसंगी भाषण करताना हरिभाऊ राठोड यांनी सर्वच राज्यातील बंजारा समाजाला समान संघटनात्मक सवलती मिळणे गरजेचे आहे, अशा आशयाचे प्रतिपादन केले. बंजारा माणसासाठी निर्माण झालेल्या बंजारा संघटनेतील अर्धेअधिक पदाधिकारी आपल्या कुटुंबात गोरबोलीचा वापर करीत नाही. यावरून बंजारा संघठनेतील पदाधिकारी यांना आपल्या गोरबोली मातृभाषेविषयी जिव्हाळा दिसून येत नाही. सभेच्या मंचावरून जोर जोऱ्याने चांगले सुरेख भाषण झोडायचे परंतु घरी गेल्यावर बंटी तुझी आई कुठे गेली असे विचारणा करतात. कशी टिकेल गोरबोली भाषा आणि बंजारा संस्कृती.

बंजारा क्रांती दलाने बंजारा समाजाला संपूर्ण भारतात सन्मान संघटनात्मक सवलती मिळाल्या पाहिजे, अशी भूमिका जाहीर केली परंतु बंजारा समाजाला सन्मान संघटनात्मक सवलती मिळवून देणे व गोरबोली टिकून ठेवणे हे सर्वच बंजारा संघटनेचे मुख्य ध्येय असले पाहिजे, नाहीतर गोरबोली नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. आजही तांडा तांड्यात आपण पाहतो गोर बोलीभाषेत इंग्रजी शब्दांनी अतिक्रमण केले आहे. काही नकामो काम करो ची भडा आज मारो मूड बरोबर छेनी कारण बंजारा भाषीक पालकांना सुद्धा इंग्रजीची अधिक ओढ. मुलांना सुरुवातीपासूनच इंग्रजी माध्यमामध्ये पाठवण्याची घाई अशी स्थिती असल्यामुळे गोर बोली चे मुंबई शहरातील उच्चाटन ही सहज होणारी गोष्ट झालेली आहे.

1926 मध्ये प्रथम झालेल्या बंगळूरु परिषदेत सुद्धा गोर बोली भाषा टिकावी, असा मुद्दा उपस्थित केला होता त्या परिषदेला संपूर्ण भारतातून फक्त 22 प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर महानायक वसंतराव नाईक यांनी सन 1953 मध्ये दिग्रस येथे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रथम अधिवेशन घेऊन त्यामध्ये प्रामुख्याने गोर बोलीभाषेच्या संवर्धनाकरिता ठराव संमत केला. या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी बापु फुलसिंग नाईक गहुली, लोकनेते बळीराम पाटील मांडवीकर, बाबूसिंग राठोड पोहा ,दगडूसिंग नाईक लोहगाव ,चंपा नाईक आंध्र प्रदेश , तेजस सिंग नाईक गुलबर्गा, हिरासिंग पवार जळगाव, बाळा सिंह गुलबर्गा, सखाराम मुडे गुरुजी उमरखेड, वसराम पाटील पांढुर्णा महाराष्ट्र, लालसिंग पटेल खंडवा एल, आर नाईक कर्नाटक, सुधाकरराव नाईक पुसद, रामसिंग भानावतजी फुलंब्री, उत्तमराव पाटील मांडवी, प्रतापसिंग आडे दिग्रस, रणजित नाईक गुलबर्गा या व्यक्तीनी कसोशीने प्रचार केला.

तसेच समकालीन सर्व समाज सुधारक यांनी बंजारा संस्कृती व गोरबोली भाषा टिकावी यासाठी अहोरात्र समाजात जागृती केली. संपूर्ण भारतात गोरबोली जिवंत ठेवण्यासाठी एक वेगळेच वातावरण निर्माण करण्यात आले. त्याला उजाळा देण्यासाठी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची एकूण आठ अधिवेशने झाली. 1953 मध्ये पहिले डिग्रस येथे अधिवेशन झाले. दुसरे अधिवेशन 1960 मध्ये गुलबर्गा कर्नाटक तर, तिसरे 1965 मध्ये मानकोटा आंध्र प्रदेश येथे झाले. चौथे अधिवेशन 1969 मध्ये चाळीसगाव येथे तर, पाचवे 1972 मध्ये पेनकोठा आंध्र प्रदेशमध्ये झाले. सहावे अधिवेशन 13 जानेवारी 1982 रोजी पुसद येथे तर, सातवे 1984 मध्ये औरंगाबाद येथे तर,आठवे 6 फेब्रुवारी 1998 रोजी बिजापूर कर्नाटक येथे अधिवेश झाले. या आठही अधिवेशनात प्रामुख्याने गोरबोली भाषा व बंजारा समाजाचा इतिहास लिहिला गेला पाहिजे असा ठराव संमत करण्यात आला.

बीजापुर कर्नाटक या अधिवेशनात गोर बोली भाषेविषयी जो ठराव मांडण्यात आला त्या ठरावात सुधाकरराव नाईक यांनी अनुमोदन दिले होते. बंजारा थोर नेत्यांनी गोर बोली भाषा टिकावी म्हणून केलेले प्रयत्न निश्चितच महत्त्वाचे आहेत. पद्मश्री रामसिंग भानावत यांनी गोर बोलीभाषा बंजारा संस्कृतीचे जतन करण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले एवढेच नाही तर ते संपूर्ण भारतात नव्हे तर विदेशात सुद्धा बोली भाषा संवर्धनासाठी प्रयत्न करत असत. ते कार्य पुढे नेण्यासाठी त्यांनी फुलंब्री येथे जागतिक बंजारा शोध पिठाची स्थापना केली होती. मुंबई बोरवलीचे उठान उच्चाटन मुंबईत गोर. बोलीचे. उच्चाटन जितक्या वेगाने चालत आहे इतकी परिस्थिती उर्वरित महाराष्ट्रात नाही. यावरून येत्या पंचवीस वर्षात गोरबोली नष्ट झाली तर आश्चर्य वाटायला नको.

बंजारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुभाष राठोड, अध्यक्ष बळीभाऊ राठोड, राष्ट्रीय अध्यक्ष दिगंबरभाऊ राठोड यांनी औरंगाबाद येथे 10 डिसेंबर 2002 ला राज्यस्तरीय बैठक बोलावून सन 2011 मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये बंजारा समाज आणि आपली मातृभाषा म्हणून प्रश्न क्रमांक दहा वर रकाना क्रमांक 11 मध्ये गोर बोली म्हणून नमूद करावे जेणेकरून बंजारा समाजाची लोकसंख्या निश्चित करण्यास मदत होईल असा ठराव औरंगाबादच्या राज्यस्तरीय बैठकीत संमत केला होता. त्यानंतर 11 जानेवारी 2003 रोजी गोर बंजारा साहित्य उमरखेडच्या वतीने आयोजित केलेल्या प्रथम गोर बंजारा साहित्य संमेलनात सुद्धा गोर बोली भाषेचा विषय प्रामुख्याने हाताळला गेला. गोर बोली भाषेविषयी असलेला न्यूनगंड औरंगाबाद येथे झालेल्या 21 जानेवारी 2003 च्या बंजारा साहित्य संमेलनात खुल्या चर्चेतून सोडवण्यासाठी प्राध्यापक धोंडीराम राठोड आणि प्राध्यापक मोतीराज राठोड यांनी प्रयत्न केले. बंजारा समाजातील प्रत्येक घटकाला गोर बोली भाषा आत्मसात असायला पाहिजे असे आवाहन केले.

गोर बोलीभाषा अनंत काळापर्यंत टिकण्यासाठी 1926 पासून अनेक परिषदा, अधिवेशन घेऊन प्रयत्न करण्यात आले आहेत. जुलै 2003 रोजी मुंबई येथे रणजीत नाईक यांनी संपूर्ण भारतातून बंजारा समाजात सेवा करणाऱ्या 151 कार्यकर्त्याची कार्यशाळा आयोजित केली होती. त्यामध्ये सुद्धा गोरबोली भाषावर सविस्तर चर्चा झाली. मनोहर भाऊंनी गोर बोलीभाषा बंजारा अधिकारी वर्ग आपल्या घरात बोलत नाही त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून बंजारा समाजातील प्रत्येक व्यक्तीने गोर बोली भाषेत संवाद साधला पाहिजे असे कळकळीचे आवाहन केले. तेवढेच करून थांबले नाहीत, तर पोहरादेवी येथे झालेल्या 11 एप्रिल 2003 च्या भव्य बंजारा मेळाव्यात तत्कालिन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थित मनोहर.भाऊंनी गोर बोलीतून अनेक राज्यातून आलेल्या तमाम बंजारा बांधवांना गोरबोली जिवंत ठेवण्याची शपथ दिली.

बंजारा कर्मचारी आणि बंजारा समाजाला गोरबोली मधून संवाद साधावा व घरांमध्ये सुद्धा गोरबोली बोलावे, असे त्यांचे ठाम मत आहे. बाबासाहेब नाईक यांना सुद्धा मराठीत बोलणे आवडायचे नाही. मराठीत बोलणाऱ्या अधिकाऱ्याला ते तु काही गोरमाटीर पेटेर छेणी कायी असे. खडसावत असत. ज्या समाजात क्रांतीसुर्य सेवालाल महाराज, लाखा बंजारा महानायक वसंतराव नाईक, जलनायक सुधाकरराव नाईक जन्म ले तो समाज कसा वाईट होऊ शकतो ती गोर बोलीभाषा कशी वाईट होऊ शकते. एक सांगू का गोर बोली भाषा बोलण्याचे तर सोडा बंजारा आहो असे सांगण्याची सुद्धा त्यांना लाज वाटते, यावरून आपली वैचारिक पातळी किती घसरली आहे हे दिसून येईल.

महानायक वसंतराव नाईक त्यांच्या प्रत्येक भाषणाच्या शेवटी दोन-चार शब्द तरी ते गोर बोलीभाषेत बोलायचे. यावरून महानायक वसंतराव नाईक यांना सुद्धा गोर बोली भाषेचे किती आकर्षण होते हे दिसून येईल. परंतु आज समाजात साधी कारकुनाची जरी नोकरी लागली तरी घरांमधून बोलीभाषा हद्दपार केल्या जाते किती विसंगती आहे. डॉ. रमेश आर्य (वडतीया) यांनी स्वतः गोरबोली भाषेची लिपी तयार करून 23 सप्टेंबर 2003 ला नागपूर येथे झालेल्या गोरबोली लिपी विषयी संकल्पना समजावून विशद केली. त्यावर प्रा. भाई प्रेमसिंग जाधव, हरिभाऊ राठोड, प्रा. मोतीराज राठोड, प्रा. धोंडीराम राठोड, एम आर राठोड आदी मान्यवर मंडळींनी गोर बोली भाषेचे महत्व आणि बंजारा समाज या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यानंतर महाराष्ट्र बंजारा समाज कर्मचारी सेवा संस्था आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघ यांच्या वतीने 6 ऑक्टोंबर 2003 पासून संपूर्ण महाराष्ट्रात बंजारा जोडो अभियानाद्वारे गोरबोली भाषेकरिता जनजागृती करीता पुणे येथून 6 ऑक्टोबर 2003 रोजी दौरा काढण्यात आला. या अभियान दौऱ्यात सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, मांडवी, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा,जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे येथे विविध कार्यक्रम झाले. शेवटी 23 ऑक्टोबर 2003 रोजी मुंबई येथे या बंजारा जोडो अभियानाचा समारोप झाला.

मुंबईचे वेगळेपण तुम्ही सुद्धा एकदा मान्य केले तर हळूहळू ग्रामीण भागात सुद्धा गोर बोलीचे उच्चाटन होईल. आज गोरबोली हळुहळू लुप्त होत आहे. उद्या बंजारा समाजाला संस्कृती गमवावी लागेल. याचा विचार करणे ही काळाची गरज आहे. आतापर्यंत बंजारा अधिकारी मंडळींनी पद्धतशीरपणे गोर बोलीचे उच्चाटन केले आहे. आता बंजारा मुले घरात बाबा अंगार चुटलं बाबा छंळी आणायला जाऊ का असा संवाद साधतात धड मराठी नाही आणि बंजारी ही नाही. त्यामुळे विज्ञान विभागाकडे झेप घेणारी पुस्तके हवी भाषीक मुलांना प्राथमिक शिक्षण जरी मराठीतून मिळाले तरी त्यांच्या मातृभाषेच्या शिक्षणाचा पाया घरामध्ये व्हायला पाहिजे यासाठी बंजारा समाजातील नेते, समाज सुधारक ,डॉक्टर, इंजिनियर ,प्राध्यापक, साहित्यिक, लेखक ,कवी, अधिकारी मंडळीनी पुढाकार घेऊन स्वतःच्या घरापासून गोरबोली सुरुवात करायला हवी नाहीतर बंजारा संस्कृती आणि गोर बोली भाषा नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. बहादूर सिंग चंद्रभान राठोड रिझर्व रिटायर हेड पोलीस आदीलाबाद यांनी बंजारा लिपी साठी एक चांगला प्रयत्न केला होता. त्यानंतर संशोधक तत्त्वज्ञ युवराज महाराज यांनी सुद्धा गोर बंजारा वर्णमाला नावाचे पुस्तक प्रकाशित करून गोरबोली भाषेचे महत्त्व वाढवण्यासाठी फार सुंदर प्रयत्न केला आहे. सध्या राष्ट्रीय बंजारा परिषदेकडून गोरबोली भाषेला आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

Related posts

जीवनावर मार्मिक भाष्य करणाऱ्या कविता – आईचा हात

Atharv Prakashan

डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या ‘पिपिलिका मुक्तिधाम’ कादंबरीस राजे संभाजी पुरस्कार जाहीर

Atharv Prakashan

ज्ञानविज्ञानाने परिपूर्ण कवितांचा संग्रह…

Atharv Prakashan

साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे मसापचे आवाहन

Atharv Prakashan

भूमार्ग, जलमार्ग हेच उन्नतमार्ग…

Atharv Prakashan

शेती पंप वीज बिलांची दुरुस्ती करताना `ही` घ्या काळजी

Atharv Prakashan

1 comment

Anonymous July 4, 2021 at 4:46 PM

साहेब तूम्ही जे लीखीत केले सध्या समाज बाधंव दूर लक्ष करत आहे गोर बोली भाषा कडे फार कमी लक्ष आहेत समाजाच
साहेब तुमच ली खान फार सुंदर आहे माहीती पन खुप आहे

Reply

Leave a Comment