November 13, 2024
Two Hundred twenty Indian Languages Dead in Fifty Years
Home » गेल्या अर्ध शतकात २२० भारतीय भाषा लुप्त…!
काय चाललयं अवतीभवती

गेल्या अर्ध शतकात २२० भारतीय भाषा लुप्त…!

भाषा अडचणीत आली तर त्या संस्कृती पुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते या पाहणीमुळे मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न नव्या चष्म्यातून ऐरणीवर आला आहे .संस्कृतीला गळती सुरू होते तेव्हा भाषा धोक्यात येतात .असा इतिहास आहे.

याडीकार पंजाब चव्हाण

निवास कदम लेआउट
वर्षा आईस फॅक्टरीजवळ
श्रीरामपूर ,ता, पुसद जि. यवतमाळ
पिन कोड 44 52 15
मोबाईल – 9552302797

गेल्या ५० वर्षाच्या काळात भारतातील सुमारे २० टक्के भाषा इतिहास जमा झाल्याचे बडोदा येथील भाषा संशोधन आणि प्रकाशन केंद्राने एका सर्वेक्षणात म्हटले आहे. देशात १९६१ मध्ये ११०० भाषा होत्या. त्यापैकी जवळपास २२० भाषा लुप्त झाल्या आहेत, असे पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ( पीएलएसआय ) लेखक आणि समन्वयक डॉ. गणेश देवी यांचे मत आहे.

२०११ पासून दोन वर्षे ही पाहाणी करण्यात आली. यापैकी ७८० आमची भाषा आढळून आल्या . १०० भाषांचा अंदाज आम्हाला लावता आला नाही. त्या गृहीत धरून ८८० भाषा होतात उर्वरित भाषा काळाच्या पोटात गडप झाल्या. हे मोठे नुकसान आहे. देशभर पसरलेल्या भटक्या जमातीकडून या भाषा बोलल्या जात होत्या. या जमाती जिवंत असतील तर केवळ तीन ते चार टक्के म्हणजे सुमारे पाच कोटी लोक त्या भाषा बोलत असाव्या.

– डाॅ. गणेश देवी

१० हजारापेक्षा जास्त भाषक हवेत

दहा हजारापेक्षा जास्त भाषक असलेल्या भाषांचा यादीत समावेश करण्याचा केंद्र सरकारच्या धोरणानुसार १९७१ च्या जनगणनेत केवळ १०८ भाषांचा समावेश करण्यात आला. अन्य सर्व भाषा इतर भाषाच्या श्रेणी नोंदवण्यात आल्या. हीच प्रक्रिया सुरू ठेवताना अनेक भाषा विसरल्या गेल्या पल्स लिंग्विस्टिक सर्व्हे (पी एल एस आय ) ने मात्र सरकारी नियम न पाळता सर्व भाषांची यादी तयार केली. मराठीत महाराष्ट्रातील भाषा हा खंड असून पुण्यात १७ ऑगस्ट रोजी तो प्रकाशित झाला. अस्तित्व संपण्याची कारणे या भाषा नाहीशा होण्याची मुख्य कारणे पाहता त्यांना मान्यता नसणे , भटक्या जमातीचे स्थलातर भाषाकांकडे जगण्याचे पर्याय नसणे, अविकसीत भाषेचा लागलेला कलंक आदीचा समावेश होतो. संवर्धनासाठी ठोस धोरणाचा अभाव ही त्यास कारणीभूत ठरतो. १९६१ च्या जनगणनेत एकूण १६५२ भाषेंची नोंद झाली होती यादीत समाविष्ट भाषेतील भिन्नता पाहता त्यांची संख्या ११०० ठेवण्यात आली.

पाश्चात्यांच्या अनुकरणातून इंग्रजी भाषेचा वाढता वापर तसेच मातृभाषेविषयी कमी होत चाललेली आपुलकी यामुळे देशातील अनेक भाषा इंग्रजाळलेल्या असून कित्येक भाषा विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. तर आज घडीला देशातील एकूण २२० भाषा नामशेष झाल्याचे धक्कादायक वास्तव्य भाषा संशोधन व प्रकाशन क्रेंद्राने केलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे. १९६१ नंतर भारतातील २० टक्के भाषा नामशेष झाल्याचे या संस्थेच्या अहवालात म्हटलेले आहे. त्यातील भाषा संशोधन व प्रकाशन केंद्राने केलेल्या संरक्षणात देशभरातील भाषांचा अभ्यासात देशातील एकूण २२० भाषा नामशेष झाल्याचे समोर आले आहे.

नामशेष झालेल्या भाषांमधील बहुतेक भाषा या भटक्या विमुक्त जमाती मधील लोकांच्या असल्याचे देवी यांचे म्हणणे आहे .देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत यांची संख्या फक्त तीन ते चार टक्केच आहे, मात्र एकूण आकडेवारीनुसार जवळपास पाच कोटी लोक या भाषा बोलतात १९६१ मधील नोंदीनुसार देशात सोळाशे बावन्न भाषा होत्या मात्र यातील बहुतेक भाषांमध्ये साम्य असल्याने हा आकडा अकराशेवर आणण्यात आला. १९७१ मध्ये सरकारच्या धोरणानुसार दहा हजारापेक्षा जास्त लोक एखादी भाषा बोलत असल्यास त्या भाषेची नोंद करण्याचे सांगण्यात आल्यामुळे या वर्षी केवळ १०८ भाषेची यादी तयार केली होती. तर बाकीच्या भाषांना इतर विभाग टाकले आहे. भारतातील मुख्य एकूण ४९ भाषांमध्ये या अहवालाचा अनुवाद करून ५ सप्टेंबर रोजी तो राजधानी नवी दिल्लीत प्रकाशित केला आहे.

भाषेचे अस्तित्व धोक्यात

शंभर वर्षापूर्वी ब्रिटिश आमदानीत भाषांची देशव्यापी पाहणी झाली होती. त्यानंतर प्रथमच भाषांचा शोध घेण्याचा एवढा मोठा प्रयत्न झाला. भाषा हा कुठल्याही संस्कृतीचा प्राण असतो. भाषा अडचणीत आली तर त्या संस्कृती पुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते या पाहणीमुळे मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न नव्या चष्म्यातून ऐरणीवर आला आहे .संस्कृतीला गळती सुरू होते तेव्हा भाषा धोक्यात येतात .असा इतिहास आहे. लुप्त झालेल्या २० टक्के भाषा भटक्या जमातीच्या होत्या. आणि पाच ते सहा कोटी लोक अशा भाषा बोलत होते. त्यामुळे त्या भाषा नष्ट झाल्याचा चटका १२५ कोटी लोकसंख्येच्या देशात जाणवला नाही. पण सुपातले जात्यात येणार नाही याचा काय भरवसा. मराठी भाषेचे तथाकथिक रक्षक या पाहणीनुसार काय शिकणार आहेत.

मराठी शाळांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह

२००१ मध्ये ७३ दशलक्ष लोक मराठी भाषिक होते. पण म्हणून मराठीचे एकूण बरे चालू आहे असे म्हणता येणार नाही. मराठी माणसाचा टक्का कमी होत चालला आहे, हीच अवस्था मराठीची आहे. मराठीला मरण नाही, पण ती मरणसन्न नाही .असे निदान करणे धाडसाचे ठरेल. त्याला कारण आहे अलीकडच्या काळात मराठी माध्यमात शिकणाऱ्यांचा ओढा सारखा कमी होतोय. मराठी पालक आपल्या मुलांना लहान वयातच इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकण्यासाठी घालत असल्याने मराठी शाळांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. अनेक मराठी शाळा बंद पडल्या. तर उरलेल्या त्या मार्गावर आहेत. यवतमाळ जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी इंग्रजी माध्यमाच्या ८५ शाळा होत्या.आता ३७१ पेक्षाही जास्त आहेत. आज ठीक आहे, पण आणखी शंभर दोनशे वर्षांनी मराठी कुठे असेल हे सांगणे अवघड आहे. वेगाने वाढत असलेल्या शहरीकरणाने मराठीची उपयोगिता दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. इंग्रजीचे जागतिक महत्त्व मराठी माणूस ओळखू लागला आहे. पूर्वीसारखी मराठी अस्मिता ही आता दिसत नाही. अस्तित्वाच्या लढाईत मराठी घुसमट होणार नाही याची काळजी संत ज्ञानेश्वर, कवी कुसुमाग्रज, कवी सुरेश भटांच्या महाराष्ट्राने घ्यावी. ही अपेक्षा आहे. पण आपल्याकडे मराठी संवर्धन आणि संरक्षणाचे धोरणच नाही.आजही मंत्रालयाच्या दारावर माय मराठी पासची वाट पाहत उभी आहे.

भारतात ७८० भाषा अन् ६० लिपी

भारतात सध्या विविध स्थानिक बोलीसह एकूण सातशे ऐंशी भाषा बोलल्या जात आहेत. तर तब्बल ६० लिपी अस्तित्वात आहेत. बडोद्याचे भाषा संशोधन आणि प्रकाशन केंद्राच्या माध्यमातून आलेल्या भारतीय भाषाच्या सर्वेक्षणातून ही बाबसमोर आली आहे. गेली पाच वर्षे देशभरात झालेल्या या सर्व्हेची माहिती या केंद्राचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध भाषा तज्ञ, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश देवी यांनी दिली आहे. यापूर्वी भारतात जॉर्ज ग्रियर्शन सारख्या संशोधकाने याची पाहाणी केली होती.

भाषा मरणाचा हिसाब किताब

प्रचंड वेगाने वाढत असलेल्या माहिती तंत्रज्ञानाची चाक घेऊन जागतिकीकरण जसजसं गतिमान होईल. तसेच सांस्कृतिक संघर्षला गती लाभणार आहे. त्या संघर्षात बरच काही हरवणार आहे. आणि बरच काही नव्यानं असणार आहे. जी एक प्रचंड घालमेल सुरू आहे. इतर भाषांचा विशेषता देशी भाषांचा बोलीभाषांचा काय होणार हा गंभीर प्रश्न आहे. नव ज्ञान, तंत्रज्ञान नुसतच पुढे येत नाही. तर ते त्यांची म्हणून एक भाषा घेऊन पुढे येतो. नवा बाजार नवी भांडवलशाही आणि हाताच्या पंजावर जगण्याचा एकवटणं आदी सार काही भाषा घेऊन धावत असतं त्याचा एक मोठा प्रभाव तयार होतो आणि उगाचच अनेक भाषांच्या वाट्याला मरणकळा यायला लागतात. लिपी असलेल्या आणि नसलेल्या कमी वयाच्या आणि जास्त वयाच्या अशा अनेक भाषा तुमच्या जगण्या-मरण्याचा हिसाब किताब मानला जातो. भारतात असा हिशोब मांडायला थोडा उशीर झाला आहे.

युनेस्कोनुसार दोन आठवड्यात एक भाषा मृत

आपली संस्कृती महान आहे. आपल्या भाषा महान आहेत. अशा अविर्भावात राहणाऱ्या भारतीयावर ही आपल्या मरण पावणार्‍या भाषा मोजण्याची वेळ आली आहे. युनेस्कोने केलेल्या एका पाहणीनुसार जगभरात सुमारे सात हजार भाषा असल्या तरी प्रत्येकी दोन आठवड्याला एक भाषा मरत आहे. भारतात ७५० भाषा आणि ६० लिपी असल्याचा शोध डॉ. गणेश देवी यांनी लावला असला तरी युनेस्कोने केलेल्या पाहणीत सुमारे १७० भारतीय भाषा मरणाच्या उंबरठ्यावर उभ्या असल्याचे आढळलं यात पुन्हा लिपी असलेल्या आणि नसलेल्या ही भाषांचा समावेश आहे.

नव तंत्रज्ञानाने भाषेचा प्रसार

आपले भाषा वैविध्य, इंग्रजीला पुरून उरणार आहे, असे डॉ. गणेश देवी यांनी निरीक्षणात नोंद केली असून जागतिकीकरणाचा प्रचंड परिणाम यावर वैविध्यावर होतो आहे हे विसरून चालणार नाही व वैविध्य टिकून ठेवण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही. पूर्वी इंग्रजीसारखी भाषा शाळेत जाऊन शिकावी लागत असे. आता तंत्रज्ञान वापरून ती शिकता येते. एखाद्या निरक्षर माणसाकडे किंवा आदिवासीकडे मोबाईल आला की आरामात शंभर – दीडशे इंग्रजी शब्द शिकू शकतो. रोज ते बोलू शकतो.

इंग्रजी म्हणजे नव्या ज्ञानाची हमी नव्या तंत्रज्ञानाची प्रतिष्ठा मिळवून देण्याची हमी माणसाला ग्लोबल बनवण्याचे हमी असं हे समीकरण तयार झाला आहे. ते भेदण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे का एखादी भाषा जास्त लोक बोलतात पण तिला लिपी नाही. जास्त लोक बोलतात पण ती ज्ञानवाहक होऊ शकत नाही तर मग ती या जागतिकीकरणाच्या रेट्यात कशी टिकणार सर्व्हे असंही सांगतो की जगातल्या ९० टक्के भाषा इंटरनेटवर दिसत नाहीत त्यामागं लिपी नसणे यासह अनेक कारण आहेत. जगात सर्वात जास्त भाषा आफ्रिकेत आहेत पण अपवादानंच काही भाषा लिपीबद्ध आहेत. भारतात वेगवेगळ्या विषय विषमतेवर वेगवेगळ्या संस्कृतीवर आधारित असल्याने स्वाभाविकच इथे भाषातील पीक उदंड आहे पण आता प्रश्न आहे तो हे की पीक कसं टिकवायचं. त्यांच्या संपत्तीत रूपांतर कसं काढायचं वेगवेगळ्या कप्प्यात अडकलेल्या भाषांना बाहेर कसं काढायचं. हा आपल्या भाषा विकसित करण्याची सर्वात मोठी जबाबदारी आज शासन आणि समाजावर आहे भाषेविषयी अभिमान हवा आणि भाषा सक्षम व्यापक बनविण्याची साधनंही असायला हवीत. भाषेचा लोप म्हणजे की प्रत्येक वेळेला विनाशं पावणंचं नसतं रूपांतर होऊनही असतं. एखाद्या संमेलनातील ठराव शासनाचा एखादा कायदा किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले आंदोलन एवढ्याच भाषाशुद्धी साठी ऊर्जा मिळत नाही तर भाषेला चौफेर जगण्याचा भाग बनवावा लागतं.

प्रचलित भाषा टिकण्याची गरज

आहेराणी, खानदेशी , कोकणी अशा बोली वेगवेगळ्या असल्या तरी मराठी भाषा एकच आहे, अशी नोंद असू शकते. याच प्रश्नावर बांगलादेशाची निर्मिती झाली हे ध्यानात घेऊन देशाचे या मुद्द्यावर आणखी तुकडे होऊ नयेत सरकारने भाषाची संख्या मर्यादित केली किमान दहा हजार लोक जी भाषा बोलतात ही भाषा हे रशियन मॉडेल स्वीकारले गेले होते हेच तत्त्व स्वीकारायचे ठरले तर संस्कृत भाषा बोलणारे दहा हजार लोक सापडणार नाहीत तसेच इंग्रजी अस्खलीत. बोलणारेही तितक्याच संख्येने आढळणार नाहीत म्हणून त्या भाषा होऊ शकत नाहीत का असा प्रश्न निर्माण होईल भाषा प्रकल्पात देशात ६३० भाषा असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात ५२ भाषा अस्तित्वात असल्याचे डॉ. गणेश देवी यांनी स्पष्ट केले आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading