डॉ. श्रीकांत पाटील, बाळासाहेब लबडे, महादेव माने, आप्पासाहेब खोत, नीलम माणगावे, अमर शेंडे आदींचा पुरस्कारामध्ये समावेश
सातारा – येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयातर्फे भास्करराव माने स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य पुरस्कार देण्यात येतात. २०२3 मध्ये प्रकाशित पुस्तकांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा अश्वमेधचे संस्थापक डॉ रविंद्र झुटींग भारती व अध्यक्ष डॉ राजेंद्र माने यांनी केली आहे.
राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य पुरस्कार डॉ. श्रीकांत पाटील यांच्या कडेलूट कादंबरीस प्रथम तर बाळासाहेब लबडे यांच्या काळमेकर लाइव्ह या कादंबरीस द्वितीय पुरस्कार जाहीर झाला आहे. २५०० रुपये व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
राज्यस्तरीय अक्षर गौरव विशेष साहित्य पुरस्कार महादेव माने यांच्या वसप या कथासंग्रहास, सुभाष कवडे यांच्या प्रकाश पेरणी कवितासंग्रहास, डॉ अनुराग लव्हेकर यांच्या वसुंधरेचे शोधयात्री या पुस्तकास जाहीर झाला आहे. आप्पासाहेब खोत यांच्या कुणब्याची पोरं या कथासंग्रहास, नीलम माणगावे यांच्या भैरवायन या कादंबरीस तर विठ्ठल खिलारी यांच्या सवळा या कादंबरीस सुद्धा जाहीर झाला आहे. एक हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
सातारा जिल्ह्यातील लेखकासाठी अक्षर गौरव साहित्य पुरस्कार देण्यात येतात. यामध्ये अमर शेंडे यांचा महाराष्ट्राचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ हा चरित्रग्रंथ, डॉ अदिती काळमेख यांचा दिडदा दिडदा हा कवितासंग्रह, सावित्री जगदाळे यांची उजळपरी ही बालकादंबरी, रेखा विजय शिर्के यांचा सु -मनांचे रेखां – ‘कण ‘ हा कवितासंग्रह, पद्माकर पाठक यांचे गोष्टी लतादीदींच्या या साहित्यकृतींचा समावेश आहे. एक हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
डॉ श्रीकांत कारखानीस अक्षर गौरव साहित्य गौरव पुरस्कार डॉ आनंद ओक व डॉ सुप्रिया ओक यांच्या आयुर अग्नी या आरोग्यविषयक पुस्तकास जाहीर झाला आहे. एकहजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.