📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 25, 2026
काय चाललयं अवतीभवती

मराठी बालकुमार साहित्य सभेतर्फे उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कारांसाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन Best Children’s Literature Awards

marathi-balakumar-sahitya-sabha-kolhapur-childrens-literature-awards-2025-entry-invitation
मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या वतीने सन २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट बालसाहित्यकृतींना वार्षिक पुरस्काराने गौरविण्यात येणार असून, इच्छुक बालसाहित्यिकांनी आपल्या पुस्तकांच्या दोन प्रती ५ सप्टेंबर २०२६ पूर्वी सभेकडे पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोल्हापूर : मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर यांच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा उत्कृष्ट बालसाहित्य निर्मिती पुरस्कार यंदाही जाहीर करण्यात आला आहे. यासाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या बालसाहित्यकृतींचा विचार करण्यात येणार आहे.

पुरस्कारासाठी कथासंग्रह, कवितासंग्रह, बालकादंबरी, समीक्षा, एकांकिका आणि चरित्र या साहित्यप्रकारांतील पुस्तकांच्या दोन प्रती पाठविण्याचे आवाहन सभेने केले आहे. साहित्यकृती सौ. नसीम जमादार, कार्याध्यक्षा, मराठी बालकुमार साहित्य सभा, तोरस्कर चौक, नावेचा कारखाना, कोल्हापूर या पत्त्यावर ५ सप्टेंबर २०२६ पूर्वी पोस्टाने पोहोचतील, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे राहणार आहे.

अधिक माहितीसाठी अध्यक्ष डॉ. श्रीकांत पाटील (मो. ९८३४३४२१२४), कार्यवाह संजय कळके (मो. ८८८८७३७३८३), उपाध्यक्ष परशराम आंबी (मो. ९४२१२०३७३२) तसेच कार्याध्यक्षा नसीम जमादार (मो. ८२७५९१८७६९) यांच्याशी संपर्क साधावा, असे मराठी बालकुमार साहित्य सभेने कळविले आहे.

Related posts

अमरवेल पुस्तकास शब्दांगण पुरस्कार

अक्षरसागर पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

लातूरच्या ल. र. फाउंडेशनचे साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406