लातूर जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक व आरोग्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संघटन म्हणून ल. र. फाऊंडेशन ओळखले जाते. या फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी मराठीतील सर्वच साहित्यप्रकारांना राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात. स्मृतीचिन्ह रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात येतो. या निमित्ताने ल. र.फांऊडेशन वाचन संस्कृतीला बळ देते. यावर्षी पुरस्काराचे हे ४ वर्ष आहे.
ल. र .फाऊंडेशने मराठी साहित्यिकांना २०२२-२०२३ या वर्षात प्रकाशित झालेले साहित्य पुरस्कारासाठी पाठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. आव्हानाला प्रतिसाद देत महाराराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यातून कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, वैचारिक साहित्य, चरित्र -आत्मचरित्र व संकीर्ण अशा साहित्यप्रकारातील २०० ग्रंथ पुरस्कारासाठी प्राप्त झाले.
यंदाच्या वर्षी पुरस्कारासाठी निवड झालेले साहित्य असे –
कथा वाड़मय प्रकार –
वटभरणाच्या रात्री – आनंद कदम (नांदेड.)
कविता वाड़मय प्रकार –
आठ फोडा, आन बाहेर फेका – अमोल विनायकराव देशमुख, परभणी
कादंबरी वाड़मय प्रकार –
पाणी फेरा – श्रीकांत श्रीपती पाटील, घुणकी. ता. हातकणंगले जि. कोल्हापूर.
वैचारिक साहित्य –
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता – डॉ. संभाजी पाटील, लातूर.
समीक्षात्मक लेखन –
‘ शिक्षण चिंतन ‘ – डॉ. सुहास बोबडे, कराड
चरित्रात्मक लेखन –
राजकीय मापदंड भाई गणपतराव देशमुख – प्रा. डॉ. किसन माने, सांगोला
ललित लेखन –
पाय आणि वाटा – सचिन वसंत पाटील. सांगली
बाल साहित्य –
खळखळता अवखळ झरा – एकनाथ आव्हाड. मुंबई
संकीर्ण विभाग –
विचार पेरत जाऊ – अलका कुलकर्णी, नाशिक
संशोधनात्मक लेखन विभाग-
राजर्षी शाहू महाराजांची निवडक सोळा भाषणे – संपादक डॉ. अनंता सूर ( यवतमाळ )
डॉ. भरत देशमुख, डॉ. जयद्रथ जाधव, डॉ. रणजीत जाधव, डॉ. ज्ञानदेव राऊत, प्रा. सुरेंद्र पाटील, डॉ. दुष्यंत कटारे, डॉ. सुधीर मुगळे, अंजली सूर्यवंशी, डॉ. नरसिंग वाघमोडे,डॉ. हंसराज भोसले, विवेक सौताडेकर यांनी पुस्तकांचे परिक्षण केले. पुरस्कार वितरण रविवारी ( २४ सप्टेंबर २०२३ ) हायटाऊन सभागृह, ऑफिसर्स क्लब, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी, बार्शी रोड लातूर येथे होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास अध्यक्ष म्हणून डॉ. नागोराव कुंभार तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजीत भालेराव व कवी रचनापर्व ब्लॉगर व तहसीलदार प्रताप वाघमारे तसेच लेखक विवेक घोटाळे आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी कै. लक्ष्मणराव रंगराव (म्हेकरे) जाधव लिखित काव्यांकुर या काव्यसंग्रहाचे प्रकाशन केले जाणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांनी दिली आहे. यावेळी डॉ. रणजीत जाधव, डॉ. सुधीर मुंगळे डॉ. विवेक घोटाळे, विवेक सौताडेकर, व्यंकट खटके, डॉ. उमाकांत जाधव, डॉ . हंसराज भोसले, डॉ. नरसिंह वाघमोडे उपस्थित होते.