January 31, 2023
Ashadi wari poem by rajendra ghorpade
Home » आषाढी वारी…
कविता

आषाढी वारी…

आषाढी वारी
मुसळधार पावसाच्या सरी
आनंदी आनंद भक्तांच्या दारी

हिरवा गार शालू पसरला भूमीवरी
नागमोडी लालसरी नदीची नथणी नाकावरी
नटली भूमाता, स्वागत करी वारकरी,
प्रसन्न मनाने भक्ती करी शेतकरी

भक्तीचा मळा फुलला दारोदारी
विठ्ठल नामाचा गजर घरोघरी
सोहम सोहमच्या माळा भक्ताघरी
आत्मज्ञानाचा फुलोरा फुलला देहमंदिरी

विठ्ठल पाहतो हा सोहळा पंढरपुरी
दूर असूनही त्याला कळती महती सारी
विचारतो वारकऱ्या पाहिलास का ही आनंदवारी
आता तरी हो एकाग्र या मनमंदिरी

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

Related posts

मानवतेची गुढी

खेळ रडीचा

पुनवची रात…..

Leave a Comment