April 26, 2024
Asparagus Medicinal Plant Information
Home » शतावरी ( ओळख औषधी वनस्पतींची )
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शतावरी ( ओळख औषधी वनस्पतींची )

ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये शतावरी वनस्पतीबद्दल माहिती…

सतिश कानवडे

संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल 9850139011, 9834884804

वनस्पतीचे नाव – शतावरी

शास्रीय नाव- Asparagus recemosus  wild

इतर नावे – शतावरी, श्वेत्मुखी, खादुरसा, शतमुखी, शतपदी

लीलीयासी या कुळातील शतावरी ही वेलवर्गीय औषधी वनस्पती आहे. ही मुळची बर्तातील आहे. शतावरीमध्ये औषधी शतावरी, भाजीची शतावरी आणि शोभेची शतावरी असे बावीस प्रकार आहेत. बारीक शेपूच्या पानासारखी पाने असणारी वेलवर्गीय शतावरी ही औषधात वापरली जाते. हिच्या फांद्यांना बारीक बारीक काटे असतात. हिची फुले पांढरट, गुलाबी, सुवासिक आणि लहान असून मे ते जुलै मध्ये येतात. फळे वाटण्यासारखी पण लहान असून पक्व झाल्यावर तांबडी होतात. शतावरीला खोडापासून जमिनीत दंडाकृती दोन्हीकडे निमुळती होणारी पांढऱ्या रंगाची अनेक मांसलमुळे येतात. मुळांची लांबी जमिनीच्या मगदुराप्रमाणे ३० ते ६० सेंटीमीटर इतकी असते. भारतात ही वनस्पती सर्वच आढळते.

जीवनक्रम –

शतावरीची झाडे उन्हाळ्यात सुप्त अवस्थेत असतात. उन्ह्याळ्यात पूस झाल्याबरोबर सुप्त गळ्यांना अंकुर येत आणि वेलीची वाढ झपाट्याने होते. वसंत ऋतूमध्ये बारीक दोन झुपकेदार फुले मंजिरीमध्ये येतात. काही दिवसानंतर वाढण्यापेक्षा लहान आकाराची व पिकल्यावर लाल अशी फळे पहावयास मिळतात. त्यानंतर हिवाळ्यात वेलीच्या फांद्या सुकाव्यास सुरवात होते व कंद खोडून काढावा.

औषधी उपयोग –

शतावरीची पाने आणि मुळे औषधात वापरतात. मूळ मूत्राशयाच्या रोगावर गुणकारी आहे. तसेच मुतखडा सफेद प्रदर रोग व शुक्रजंतू वाढीसाठी उपयोगी आहे. दुध सुटण्यासाठी आणि भूक वाढविण्यासाठी मुळांचा उपयोग करतात. गर्भाशयातील पिडा कमी करते, शक्ती वाढविण्यासाठी उपयोगी, वात, पित्त, कफ रोधक, ताणतणाव, मधुमेह, आतड्यांचे आजार, हार्मोन संतुलन, रोगप्रतिकारकशक्ती वाढवते.

हवामान व जमीन –

शतावरी पिकास समशीतोष्ण व उष्ण हवामान चांगले मानवते. उत्तम निचरा होणारी जमीन चांगली असते.दोन रोपात ९० सेमी व दोन, तीन, सात फुट अंतर असावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे १० ते १२ दिवसांनी पाणी द्यावे.

काढणी –

शतावरी मुलांची १.५ ते २ (साधारण १८ महिने) वर्षांनी करावी. कुदळीने किंवा टिकावाने जमीन खोडून काळजीपूर्वक मुले काढून घ्यावीत. खोडाला २ .३  मुळे ठेऊन परत ती मातीत गाडून ठेवावीत म्हणजे पुढील वर्षी उत्पन्न मुळू शकेल. काढलेल्या मुलावरील माती पाण्याने धुऊन घ्यावी व १० ते १५ सेंटीमीटर लांबीचे  तुकडे करावेत. हेक्टरी उत्पादन साधारण १२ ते १५ क्विंटल सुकलेल्या मुळ्या मिळतात.

Related posts

वणव्याबाबत गोवा सतर्क, केली ही उपाययोजना..

हवेचे प्रदूषण गांभिर्याने घेण्याचा विषय

भारत बनतोय “इंटरनेट” धारकांची उपराजधानी !

Leave a Comment