April 19, 2024
belgaum-liberary-acharya-atre-literature-award-to-veteran-litterateur-mahadev-more
Home » साहित्यिक महादेव मोरे यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

साहित्यिक महादेव मोरे यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार जाहीर

बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालय संस्थेतर्फे देण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठेचा ‘आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार-२०२२’ ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांना देण्याचा निर्णय कार्यकारी मंडळाने घेतला आहे, अशी माहिती कार्यवाह रघुनाथ बांडगी यांनी दिली आहे. २५ हजार रुपये , मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

हा परस्कार साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रथितयश लेखकास दरवर्षी देण्यात येतो. यापूर्वी ‘पानीपत’कार विश्वास पाटील, अरुण साधू (मुंबई), डॉ. जयसिंगराव पवार (कोल्हापूर), उत्तम कांबळे (नाशिक), कॉ. कष्णा मेणसे (बेळगाव), डॉ. सदानंद मोरे (पुणे), पद्मश्री मधु मंगेश कर्णिक (मुंबई), सतीश काळसेकर (मुंबई), कुमार केतकर (मुंबई), विष्णू सूर्या वाघ (गोवा), डॉ. आ. ह. साळुखे (सातारा), प्रा. डॉ. रावसाहेब कसबे (नाशिक), डॉ. राजन गवस (गारगोटी), मनस्विनी लता रविंद्र (मुंबई) व प्रवीण बांदेकर (सावंतवाडी) यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.

हा साहित्य पुरस्कार रविवारी (ता. १४ ) सायंकाळी पाच वाजता सार्वजनिक वाचनालयाचे सभागृह, गणपत गल्ली, बेळगाव येथे देण्यात येणार आहे.

महादेव मोरे यांच्यावरील डॉक्युमेंट्री पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Related posts

महाराष्ट्रात दहा दिवस अवकाळी पावसाचे वातावरण

अदानींचा ग्रीन एनर्जीचा प्रकल्प अखेर रद्द – प्रकाश आबिटकर

सध्याच्या राजकिय वातावरणाचा विचार करता महाराष्ट्रात मध्यावर्ती निवडणुका होतील असे आपणास वाटते का ?

Leave a Comment