शेती आणि शेतकरी जीवनाशी निगडित अनेक विषयांना शब्दबद्ध करणारे सिद्धहस्त कथालेखक सचिन वसंत पाटील यांनी “अवकाळी विळखा” या कथासंग्रहातून अस्मानी, सुलतानी आणि नैसर्गिक संकटांनी त्रस्त शेतकऱ्याचे विदारक सत्य मांडले आहे.
गेल्या वर्षी प्रचंड दुष्काळ आणि या वर्षी अति पाऊस यांमुळे हतबल झालेला शेतकरी पिचून गेला आहे. ऐन दिवाळीत अंधकारात हरवला आहे… त्याचं हातीतोंडी आलेलं पीक पावसामुळे वाया गेलं… सोयाबीन केटं झालं, कापूस काळा पडला, कांदा कुजला. आठवडी बाजारातनं माल खपेना, गिर्हाईक मिळेना. टोमॅटो फेकून द्यायची वेळ आली. पावसाच्या बुरबुरीनं रानभर तणकट माजलंय… कामगार शिरजोर झालाय. आधीच लुळं असलेलं त्याचं कंबरडं ऊस कारखानदारांनी बिल न दिल्यामुळं मोडलं आहे. मग दिवाळी साजरी कशी करावी ?
शेजारी नोकरदार असणाऱ्या घरातला थाटमाट पाहून तो निराश होतोय. पोरं तर्रबित्तर झालीयत. बापाला पिप्याचं पितर अशा नजरेनं बघतायत. फास लावून आत्महत्या करावी की रान बिल्डरांना विकून टाकावं ? अशा कात्रित सापडलाय तो ! एका बाजूला नोकरदार, व्यापारी, धंदेवाईक श्रीमंत लोक नि दुसऱ्या बाजूला अल्पभूधारक गरीब कष्टकरी शेतकरी अशी दुफळी गावागावांत पडतेय. ही कुठल्याही जातीधर्मापेक्षाही वाईट आहे.
घर बघितलं की लक्षात येतं, की हे शेतकऱ्याचं घर आहे. कपडे बघितले तरी लक्षात येतं, हे शेतकऱ्याचे आहेत…एवढंच काय त्याचं तुटकं चप्पल बघितलं तरी कळतं हे शेतकऱ्याचं आहे..! खरोखरच आज शेतकरी अंधकारात हरवलाय…या लखलखत्या दिवाळीतही शेतकऱ्याच्या घरात अंधारच आहे..!!
शेती आणि शेतकरी जीवनाशी निगडित अनेक विषयांना शब्दबद्ध करणारे सिद्धहस्त कथालेखक सचिन वसंत पाटील यांनी “अवकाळी विळखा” या कथासंग्रहातून अस्मानी, सुलतानी आणि नैसर्गिक संकटांनी त्रस्त शेतकऱ्याचे विदारक सत्य मांडले आहे. या कथासंग्रहास अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे, तसेच या संग्रहातील ‘कष्टाची भाकरी’ ही कथा सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे बी. ए. भाग – १ च्या अभ्यासक्रमातही समाविष्ट करण्यात आली आहे.
कथासंग्रह – अवकाळी विळखा
लेखक – सचिन वसंत पाटील, 8275377049
प्रकाशक – तेजश्री प्रकाशन, इचलकरंजी
पृष्ठे : १७६, मूल्य : ३०० रुपये
सवलतीत १५० रुपये पोस्टेजसह
मोबा. 82756 38396..
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.