April 24, 2024
Ignore the untimely vulgarity
Home » अवकाळीच्या वल्गनाकडे दुर्लक्ष करा
काय चाललयं अवतीभवती

अवकाळीच्या वल्गनाकडे दुर्लक्ष करा

मागील चार दिवसातील, म्हणजे १६ ते २० मार्च दरम्यान विदर्भातील अवकाळीचे उदाहरण बघता,  प्रत्यक्षात झालेले पर्ज्यन्य आणि गारपीट ही वातावरणीय अपेक्षेप्रमाणे मर्यादित क्षेत्रात व खुपच कमी तीव्रतेची व अंदाजित पूर्वानुमानाला साजेशीच होती. परंतु प्रत्यक्षात अवकाळीबाबतचा अति टोकाच्या बातम्यांचा धुमाकूळ व घाबरवणारा डांगोराच अधिक पिटवला गेला, असे दिसलें. म्हणून हे उदाहरण दिले. आताही पुन्हा असेच होवु शकते, असे वाटते म्हणून

सध्याच्या कांदा, काढणी व साठवणीच्या तसेच आंबा, द्राक्षे, डाळिंब, संत्रा इत्यादी फळबागा सौंद्यांच्या व काढणी, पॅकिंगच्या तयारीत तर भरड धान्यांची खळ्यावर धामधूम शेतकरी करत असतांना,  सोशल मीडियावर अवकाळीच्या बातम्यांचा सध्या रोज भडीमार चालु आहे. शेतकऱ्यांना नकळत भेदरवले जात आहे, कि काय, असे वाटू लागले. त्या बचावासाठीच तर खरं वातावरणाची विशेष घडामोड नसतांनाही परखडपणे येथे लिहावे लागत आहे.

सौदे करणारे शेतकरी व व्यापाऱ्यांनी तर अवकाळीच्या अतिरंजित बातम्यांकडे दुर्लक्ष करावे, असेच वाटते. तसेच काही असल्यास मात्र नक्कीच अवगत केले जाईल.

विदर्भात ढगाळ वातावरणाची शक्यता

गुरुवार ता. २८ ते रविवार ता. ३१ मार्च दरम्यानच्या चार दिवसा (रंगपंचमी व नाथषट्ठी) पैकी फक्त एक-दोन दिवस विदर्भ मराठवाड्यात केवळ ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तसेच शुक्रवार ता. १२ ते गुरुवार ता..१८ एप्रिलपर्यंतच्या)आठवड्यात म्हणजे गुढीपाडवा झाल्यानंतर दोन दिवसांनी ते रामनवमीपर्यंत, मुंबईसह कोकण वगळता खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भातील फक्त काही भागात केवळ ढगाळ वातावरण राहून किंचित तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यामुळे घाबरू तर नयेच, शिवाय अजुन तीन आठवडे हातात असुन शक्य असल्यास शेतकऱ्यांनी शेतकामाचे त्या पद्धतीने नियोजन करता येऊ शकते, असे वाटते. खुप अगोदर आगाऊ सूचना येथे केली आहे. तसेही वातावरणात जर काही बदल झाल्यास तसे सूचित केले जाईलच.

पहिले  मार्गस्थ होत असतांनाच मंगळवार ता.२६ मार्चला रात्री नवीन पश्चिमी झंजावात, अतिउत्तर भारतातील पश्चिमी हिमालयीन राज्यात प्रवेशणार असुन तेथे पाऊस बर्फवृष्टी व थंडी जाणवेल.
परिणामी महाराष्ट्रातही मुंबईसह कोकण व मध्य महाराष्ट्रातील कमाल किमान तापमाने सरासरी इतकी तर काही ठिकाणी सरासरीच्या खाली सध्या अजूनही जाणवत आहे. एल- निनोच्या वर्षात दोन्हीही तापमाने लाभदायक राहून महाराष्ट्रातील रब्बी पिकांना मदत तर केलीच व मार्चअखेरपर्यंत उभ्या पिकांना अजुनही फायदा होत आहे, असेच समजावे.

माणिकराव खुळे

Related posts

Neettu Talks : आत्मविश्वास कसा वाढवायचा ?

शिष्याचे स्वभावदर्शन

चार, पाच, सहा मार्च रोजी महाराष्ट्रात उकाड्यात वाढ – माणिकराव खुळे

Leave a Comment