March 25, 2023
khel-radicha-poem-by-tukaram-patil
Home » खेळ रडीचा
कविता

खेळ रडीचा

खेळ रडीचा

गाव पुढारी दारी येतो उसन्या साठी
नजर विखारी असते त्याची लुटण्यासाठी

गंमत होते तेव्हा कोणी का थांबावे
कोणालाही नसते बंदी हसण्यासाठी

सावध वागा सांगायाचे काय तुम्हाला
हाती फुरसे धरताकाहो डसण्यासाठी

रीत जगाची घातक आहे जो तो म्हणतो
कापायाचा उमदा बकरा जगण्यासाठी

कोणालाही वाटत असते मिरवत जावे
चकमक झगमग नटणे असते दिसण्यासाठी

कळते सारे या जगताला करता चाळे
खेळत जाता खेळ रडीचा जितण्यासाठी

पटतेकाहो कोणालातर सांगा हे मज
म्हाताऱ्यांनी राबायाचे तरण्यासाठी

बदलत गेले हरवत गेले सगळे काही
संस्काराचे बंधन तुटले सजण्यासाठी

तुकाराम पाटील
चिंचवड, पुणे 33

Related posts

फुलासारखं जपणं…

तुझ्यामुळेच दरवळला आसमंत….

लढायचे आहे बेरोजगारीशी…

Leave a Comment