📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 31, 2026
काय चाललयं अवतीभवती

महात्मा फुले दीर्घ काव्य स्पर्धेत कवी महावीर कांबळे प्रथम

महात्मा फुले द्विजन्मशताब्दीनिमित्त आयोजित दीर्घ काव्य स्पर्धेत इचलकरंजीचे कवी महावीर कांबळे यांच्या ‘मुक्तीची फुले’ कवितेला प्रथम क्रमांक. अश्विनी दीक्षित, राजेंद्र मुंढे यांचाही गौरव.
  • अश्विनी दीक्षित,राजेंद्र मुंढे,राजेंद्र पारे,योगिता शेटकर,सायली नारकर यांचाही सन्मान
  • राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र, समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे स्पर्धेचे आयोजन

कणकवली – महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित केलेल्या दीर्घ काव्य स्पर्धेत इचलकरंजी येथील कवी महावीर कांबळे यांच्या ‘मुक्तीची फुले’ या दीर्घ कवितेने प्रथम क्रमांकाचे पाच हजार आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाचे पारितोषिक प्राप्त केले असल्याची माहिती या स्पर्धेचे प्रमुख संयोजक, ज्येष्ठ कादंबरीकार तथा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख,राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा कांदळकर आणि समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांनी दिली. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून समीक्षक प्रा.संजीवनी पाटील यांनी काम पाहिले.

बारामती येथील कवयित्री अश्विनी दीक्षित यांच्या ‘फुले, तुम्ही परत या!’ या दीर्घ कवितेने द्वितीय आणि वर्धा येथील कवी राजेंद्र मुंढे यांच्या ‘मातीच्या कपाळावर उठलेला उजेड’ या कवितेने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. तर या स्पर्धेत जळगाव येथील कवी राजेंद्र पारे यांच्या ‘विद्रोहाची मशाल’, सावंतवाडी येथील कवयित्री योगिता शेटकर यांच्या ‘फुलेंशी संवाद’ आणि कासार्डे येथील कवयित्री सायली नारकर यांच्या ‘फुले विचारांची शृंखला’ या कवितांनी उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त केली आहेत. ही पारितोषिक अनुक्रमे 3000 रुपये 2000 रुपये आणि उत्तेजनार्थ प्रत्येकी 1000 रुपये आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरूपाची आहेत.

परीक्षकांनी या स्पर्धेतील प्रथम विजेत्या कवी महावीर कांबळे यांच्या ‘मुक्तीची फुले’ या कवितेच्या निवडीबद्दल म्हटले आहे की, आपण राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झालो असलो तरी मानसिकदृष्ट्या पुन्हा बंदिस्त झालो आहोत. ही नवी गुलामगिरी इंग्रजांनी लादलेली नाही, तर ती आपणच आपल्यावर लादून घेतलेली आहे – ती आहे जातीयतेची, धर्मांधतेची, पंथीय अहंकाराची, बाजारू संस्कृतीची आणि सत्तेच्या हव्यासाची. या नव्या बंदिवासातून बाहेर काढण्यासाठीच कवीने ही मुक्तीची फुले रचली आहेत.

दरम्यान या सर्व पारितोषक विजेत्या कवींना 27 ते 29 नोव्हेंबरला पुण्यात होणाऱ्या फुले फेस्टिवलमध्ये अध्यक्ष व उद्घाटकांच्या हस्ते पारितोषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वराज्यासाठीच्या लढ्यात स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा या तीन महत्त्वाच्या तत्त्वांवर भर – अमित शाह

सध्याच्या राजकिय वातावरणाचा विचार करता महाराष्ट्रात मध्यावर्ती निवडणुका होतील असे आपणास वाटते का ?

एकविसाव्या शतकातील ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि व्याप्ती – संशोधनात्मक ग्रंथासाठी लेख पाठविण्याचे आवाहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406