- 2022 च्या हंगामाकरिता खोबऱ्यासाठीच्या किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थ विषयक समितीचा निर्णय
- खोबऱ्याची एमएसपी प्रती क्विंटल 10,335 रुपयांवरून 2022 च्या हंगामासाठी 10,590 रुपये प्रती क्विंटल
- गोटा खोबऱ्यासाठीच्या एमएसपी प्रती क्विंटल 10,600 रुपयांवरून 2022 च्या हंगामासाठी 11,000 रुपये प्रती क्विंटल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थ विषयक समितीने 2022 च्या हंगामाकरिता खोबऱ्यासाठीच्या किमान आधारभूत किमतीला (एमएसपी) मंजुरी दिली.
तेल काढण्याच्या घाणीसाठी उपयुक्त योग्य सरासरी गुणवत्ता (एफएक्यू) असलेल्या खोबऱ्याच्या एमएसपीमध्ये वाढ केली आहे. 2021 साठी प्रती क्विंटल 10,335 रुपये असणारी खोबऱ्यासाठी किमान आधारभूत किंमत 2022 च्या हंगामासाठी 10,590 रुपये प्रती क्विंटल इतकी करण्यात आली आहे.
गोटा खोबऱ्यासाठी 2021 मध्ये प्रती क्विंटल 10,600 रुपये इतकी किमान आधारभूत किंमत होती. यामध्ये वाढ करून 2022 च्या हंगामासाठी 11,000 रुपये प्रती क्विंटल इतकी करण्यात आली आहे. हे अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चापेक्षा खोबरे घाणीसाठी 51.85 टक्के आणि गोटा खोबऱ्यासाठी 57.73 टक्के लाभ सुनिश्चित करते. 2022 हंगामासाठी खोबऱ्याच्या एमएसपीमधली वाढ ही अखिल भारतीय सरासरी खर्चाच्या किमान दीड पट स्तरावर निश्चित करण्याच्या तत्वाला अनुसरून आहे. 2018-19 च्या अर्थसंकल्पात याची घोषणा सरकारने केली होती.वकृषी खर्च आणि मूल्य आयोगाच्या शिफारसीवर हा निर्णय आधारित आहे.
2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने लाभ रूपाने किमान 50 टक्के नफा सुनिश्चित करणे हे महत्त्वपूर्ण आणि प्रगतिशील पाऊल आहे. नारळ उत्पादक राज्यांतील एमएसपी कार्यासाठी भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ लिमिटेड आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ हे केंद्रीय नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.