जीवनात उत्साह खूप महत्वपूर्ण असतो, कारण उत्साहामुळे आपल्या जीवनात आपण कोणतेही कार्य करू शकतो. जीवनात उत्साह असणे खूप आवश्यक आहे. मग ते जीवनातील कोणतेही कार्य का असेना. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात, असे मला वाटते.
सुजाता रणसिंग
पुणे येथे झालेल्या मिसेस महाराष्ट्र इम्प्रेस ऑफ महाराष्ट्र 2021 स्पर्धेत सुजाता रणसिंग यांना मिसेस अचीव्हर दिवा 2021 हा किताब मिळाला. या स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी महाराष्ट्रातून 50 विवाहित सौंदर्यवतींची निवड केली होती. सुजाता यांना अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते मानाचा मुकुट प्रदान करण्यात आला.
मिळालेल्या पुरस्कारनंतर बोलताना सुजाता म्हणाल्या, माझा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मला या स्पर्धेची मदत मिळाली आणि कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे स्पर्धेतून समजले. माझ्या यशामध्ये माझे कुटुंब, मित्र परिवार आणि अंजना मास्करेन्हस व कार्ल सर यांचे सहकार्य लाभले. माझ्या स्वतःच्या शाळा असून देखील मी सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला कारण फॅशन स्पर्धेत सहभागी होणे ही माझी आवड होती, एक उत्साह होता.
दिवा पेजेन्ट्सचे संचालक कार्ल आणि अंजना मास्करेन्ह्स यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महिलांनी सक्षम व्हावे, त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत व्हावा, स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांनी पुढे यावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
प्रवास आयुष्याचा सुरू होतो जन्मताच…
सुजाता यांनी पुरस्काराच्या निमित्ताने त्याचा जीवनप्रवास उलघडला. सुजाता म्हणाल्या, शालेय शिक्षणानंतर लगेच लग्न झाल्यापासून निष्पाप आणि भोळ्या शाळकरी मुलीपासून ते अत्याधुनिक व्यवसायिक स्त्रीपर्यंत मी बरेच चढ उतार पाहिले. मी अभ्यासात हुशार होते आणि मला आयुष्यात उच्च शिक्षण घेण्याची आवड होती, म्हणून मी माझे शिक्षण कधीच सोडले नाही. सर्व चढ -उतार असूनही मी लग्नानंतर माझ्या पदवीचा पाठपुरावा केला. जेव्हा मी कनिष्ठ महाविद्यालयात होते, तेव्हा मी माझ्या पहिल्या बाळाला जन्म देण्याच्या मार्गावर होते. माझे पती आयटी प्रोफेशनल आहेत आणि त्यांना बहुतेक वेळा देशाबाहेर प्रवास करावा लागत होता आणि सुरुवातीला मी त्याच्यासोबत प्रवास करायचे. पण समाजासाठी स्वतःचे काहीतरी करण्याची माझी नेहमीच इच्छा होती. या दरम्यान मला दुसरे बाळ होणार होते. सर्व बंधनामध्ये मी अजूनही माझे शिक्षण घेत होते आणि माझी स्वप्ने साध्य करण्यासाठी भारतात स्थायिक झाले.
सुजाता पुढे म्हणाल्या, मी माझ्या बंगल्याचे पूर्व प्राथमिक शाळेत रूपांतर केले आणि माझ्या स्वप्नाचा दिशेने पहिल पाऊल टाकले. आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी स्वतःला तयार केले. मी उपयुक्त संपर्क विकसित केले. मी माझे व्यक्तिमत्त्व देखील तयार केले आणि मी इतरांनाही मदत केली आणि प्रेरित केले. आज माझी शाळा तीन शाखांसह ज्युनिअर कॉलेज पर्यंत आहे. विसडम इंटरनॅशनल स्कुल नावाने चंदननगर, वाघोली व कोरेगाव भिमा येथे सुरु केलेली शाळा आता ज्युनिअर कॉलेजपर्यंत पोहोचली आहे.
misses achiver diva award to sujata ransingh misses achiver diva award to sujata ransingh misses achiver diva award to sujata ransingh misses achiver diva award to sujata ransingh