अनमोल खजिना आहे. यातील बंदिशींची बांधणी अतिशय सहजसुंदर आहे. स्वराविष्कार, कलात्मकता, भावपूर्णता, गेयता, नादमयता सर्वच बाबतीत या बंदिशी काळाच्या कसोटीवर उतरणाऱ्या आहेत.
राजीव प्रद्माकर बर्वे
पंडीत पद्माकर बर्वे यांच्या निवडक बंदिशीचा रसराज हा संग्रह पुनर्प्रकाशित होतो आहे याबद्दल अतिशय समाधान वाटते आहे. शास्त्रीय संगीताच्या अभ्यासकांसाठी, विद्यार्थ्यासाठी, रसिकांसाठी आणि बंदिशकारांसाठी हा अनमोल खजिना आहे. स्वराविष्कार, कलात्मकता भावपूर्णता, गेयता, नादमयता या सर्वच बाबतीत या बंदिशी काळाच्या कसोटीवर उतरणाऱ्या आहेत.
आकाशवाणीचे उच्चश्रेणीचे मान्यताप्राप्त गायक, अभ्यासक आणि बंदिशकार म्हणून पद्माकर बर्वे यांचा नावलौकिक होता. रागाची शुद्धता, बढत, तालांग, स्वरविस्तार, बांधणी, डौल, काव्यात्मकता, गेयता, स्वरलगाव या सर्वच बाबतीत या बंदिशी सरस आणि श्रवणीय आहेत. याचे कारण असे की या बंदिशींची बांधणी सहजसुंदर, नैसर्गिक आहे. त्यामुळे त्या गाताना आणि ऐकतानाही कृत्रिम वाटत नाही. या बंदिशी स्वरप्रधान त्याचबरोबर शब्दप्रधानही आहेत.
शास्त्रीय संगीत गाताना स्वरांबरोबर शब्दांनाही तेवढेच महत्त्व द्यायला हवे. ही पंडित पद्माकर बर्वे यांची ठाम भूमिका होती. स्वरांमधल्या श्रुती, मिंड आणि कणस्वर ते स्वतः उत्तमरित्या गाऊनही दाखवत असत आणि शिकवतही असत. मुलगा आणि शिष्य म्हणून त्यांना ऐकण्याचे, त्यांच्याकडून बंदिशी शिकण्याचे भाग्य मला लाभले. माझी आई प्रख्यात गायिका मालती पांडे (बर्वे) ही देखील बाबांच्या बंदिशी मैफिलींमधून गात असे व शिष्यांना शिकवतही असे. या दोघांच्याही गायनाचे संस्कार कळत नकळत माझ्यावरही झाले.बाबांनी अनेक विद्यापिठांमधून, संस्थांमधून सप्रयोग व्याख्याने दिली. मुक्तसंगीत चर्चामधून आपले संगीतविषयक विचार मांडले. त्यांच्या बंदिशीवर आधारित नृत्यरचनाही आपापल्या कार्यक्रमांमधून अनेक नृत्यांगना अजूनही सादर करीत असतात.
पंडीत पद्माकर बर्वे यांच्या निवडक बंदिशींचा रसराज हा संग्रह, शास्त्रीय संगीताच्या अभ्यासकांसाठी अनमोल खजिना आहे. यातील बंदिशींची बांधणी अतिशय सहजसुंदर आहे. स्वराविष्कार, कलात्मकता, भावपूर्णता, गेयता, नादमयता सर्वच बाबतीत या बंदिशी काळाच्या कसोटीवर उतरणाऱ्या आहेत. मैफिलींमध्ये त्या सादर करताना आणि ऐकताना उच्चतम स्वरानुभूतीचा प्रत्यय येतो. स्वरांच्या आणि शब्दांच्या सुरेल मिलाफामुळे बंदिशींमधील रागाचे व अर्थाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. हा अभिजात ठेवा अभ्यासकांना निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.
पुस्तकाचे नाव – पं. पद्माकर बर्वे रसराज ( निवडक बंदिशी)
प्रकाशक – महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई