📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 22, 2026
काय चाललयं अवतीभवती

प्रज्ञा बहुउद्देशीय संस्थेकडून पुस्तक पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

Pragya Multipurpose Foundation announces call for book entries published in 2025 for state-level awards

पुणे – प्रज्ञा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सन 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींकरिता पुस्तक पुरस्कारासाठी आवाहन करण्यात आले आहे. संस्थेने जारी केलेल्या नियमावलीनुसार १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेले साहित्यच या स्पर्धेत ग्राह्य धरले जाणार आहे. साहित्यकृती पाठविण्याची अंतिम तारीख १० जानेवारी २०२६ अशी जाहीर करण्यात आली आहे.

संस्थेने स्पष्ट केले आहे की प्रत्येक साहित्य प्रकारातून तीन क्रमांक जाहीर केले जाणार आहेत. स्पर्धेसाठी पुस्तकांच्या दोन प्रती पाठवणे अनिवार्य आहे. साहित्यकृती कोणत्या प्रकारात मोडते याची खात्री करूनच त्या संबंधित परीक्षकांच्या पत्त्यावर पुस्तकं पाठवण्याची सूचना केली आहे. हे पुरस्कार पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीसच देण्यात येणार आहेत.

पुस्तकं पाठवण्यासाठी पत्ता 👇👇👇

📕कविता/गझल& ललित
डॉ राजेंद्र केंगार, उत्कर्षा हॉस्पिटल,मेन पेठ,मांडवे गिरवी रोड,मूपो मांडवे, ताल माळशिरस, जि सोलापूर. 413111
मोबाईल नं-9673383064

📕बालसाहित्य
डॉ. सुभाष हरिबा कटकदौंड
अनुजा नर्सिंग ॲन्ड सर्जीकल होम, प्रतिभा कॉम्प्लेक्स, सी विंग, खोपोली, तालुका – खालापुर
जिल्हा – रायगड, महाराष्ट्र पिन कोड – ४१०२०३
मो. ९५६१२८४४०८, ९३५९४८७८२३

📕कथासंग्रह
डॉ. नरेंद्र कदम
C/O माथाडी हॉस्पिटल ट्रस्ट, ३१५/ ४ था माळा, मध्यवर्ती सुविधा इमारत फळ बाजार, सेक्टर १९, वाशी, नवीमुंबई ४००७०३
+91 98690 61889

📕कादंबरी
कर्नल शरदचंद्र पाटील (निवृत्त)
आरोहिणी बंगला, प्लिंथ एल ८, दीनानाथ मंगेशकर रुग्णालया समोर, एरंडवणे, पुणे. पिन ४११००४
मोबाईल: ७०२०५३९६८४

📕आत्मचरित्र, समीक्षा, वैचारिक
डॉ. सुधाकर बेंद्रे, १ कीर्ती गृहनिर्माण संस्था, नागठाणे, ता.जि. सातारा.
पिन कोड ४१५५१९
९८२२०६७८५७

Related posts

बालविश्व काव्यसंग्रहामध्ये बालकांचे प्रभावी बालविश्व- कवयित्री उषा परब

आधुनिकता न सोडताही आपले भारतीयत्व टिकवले पाहिजे हाच आग्रह

गरजूंना सेवाभावी `संदीप’ चा ‘आधार’.

Leave a Comment

1 review

babu shirodkar November 29, 2025 at 1:27 PM
vimukat liberated (in marathi)

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406