गुहागर येथील पसायदान प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरिय काव्यपुरस्कार देण्यात येतात. यासाठी कविता संग्रह पाठविण्यात यावेत, असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.
२०१४ या वर्षापासून पसायदान प्रतिष्ठानच्या वतिने पसायदान राज्यस्तरिय काव्य पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. कविता संग्रहासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. कविता संग्रहासाठी विषयाचे बंधन नाही. मान्यवर समीक्षकांच्या समितीद्वारा योग्य दोन कविता संग्रहाची निवड केली जाते.
प्रत्येकी ३००० रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून पुरस्कारप्राप्त दोन कवींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येते. तरी १ जानेवारी२०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रकाशित झालेल्या स्वरचित कविता संग्रहाच्या दोन प्रती १०मार्च २०२३ पर्यंत पाठवाव्यात.
पुस्तकाच्या प्रती संयोजक, पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांच्यानावे ईश्वरचंद्र हलगरे, ‘जय जवान’ व्याघ्रांबरी देवळाच्या समोर, देवपाट, गुहागर ता. गुहागर जि. रत्नागिरी 415703
संपर्क 94041 61180 या पत्त्यावर पाठवाव्यात.