September 27, 2023
Sparrow Talk Viral Jokes
Home » चिमणी नक्की काय बोलत असावी बरं….
व्हायरल

चिमणी नक्की काय बोलत असावी बरं….

आज सकाळी सकाळी लवकर उठून गॅलरीत बसलो…😊😊

रोज सकाळपासूनच न भिता दिवसभर चिमण्यांचा मुक्त संचार सुरूच असतो…💃

आजही चिमणा चिमणी जोडी सकाळीच हजर झाली…😄

चिमणा टाकलेले दाणे टिपण्यात दंग होता…तर चिमणी कुंडीतील मिळालेली एक छोटी काडी चोचीत धरून सारखी चिवचिवत होती…तिच्या भाषेत काय बोलत असावी काय कळत नव्हतं…🤔🤔

मी विचारच करत होतो चिमणी नक्की काय बोलत असावी बरं….
🤔🤔

तेवढ्यात बायको चहा घेऊन आली…
मी बायकोला विचारले, “अगं, ती चिमणी चोचीत काडी धरून चिमण्याशी काय बोलत असेल बरं…”😊😊

बायको म्हणाली, “अहो, ती चिमणी काडी चोचीत धरून म्हणतेय की चिमण्या, तू घरात काडीचं काम करत नाही…”🤨🤨

अशाप्रकारे ती चहा ठेवून किचनमध्ये निघून गेली…😨😨

Related posts

आंब्याच्या विविध जाती…

फुलबाज्या…

घरातला पिज्जा

Leave a Comment