युगसंवाद साहित्य व सांस्कृतिक चळवळ भंडारा संलग्नित वैनाकाठ फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय समाज , शिक्षण व साहित्य क्षेत्रातील पुरस्काराचा वितरण सोहळा थाटामाटात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक ॲड. लखनसिंह कटरे (निवृत्त डीडीआर) होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ लेखक व समीक्षक प्रा. डॉ. गिरीश सपाटे रामटेक, तसेच विदर्भ साहित्य संघ शाखा भंडाराचे अध्यक्ष डॉ गुरुप्रसाद पाखमोडे होते.
वैनाकाठ फाऊंडेशनतर्फे देण्यात आलेले पुरस्कार असे –
वाड्मयप्रकारातील पुरस्कार
१ मुकुंदराज काव्य पुरस्कार
आडतासाच्या कविता:श्रीकांत ढेरंगे,संगमनेर
टिंब प्रकाशन वडाळा, मुंबई
२ घनश्याम डोंगरे कथा पुरस्कार
रज्जुत मज्जा: स्वप्नील चव्हाण,कल्याण
शोधक प्रकाशन ,कल्याण
३ ना.रा.शेंडे कादंबरी पुरस्कार
ते पन्नास दिवस: पवन भगत, बल्लारशाह
मैत्री प्रकाशन, पुणे/नांदेड
४ डॉ.अनिल नितनवरे समीक्षा पुरस्कार
प्रकाश किनगावकर यांची कविता:डॉ.संजय बोरुडे, अहमदनगर
सहित्याक्षर प्रकाशन ,संगमनेर
५ डॉ.आंबेडकर वैचारिक ग्रंथ पुरस्कार
विवाहसंस्था:अनुराधा नेरूरकर, मुंबई
ग्रंथाली प्रकाशन ,मुंबई
६ महात्मा कालिचरण नंदागवळी समाजमित्र पुरस्कार
देवाजी तोफा, प्रसिद्ध समाजसेवी ,(लेखा मेंढा)जिल्हा गडचिरोली
७ जे.पी.नाईक शिक्षणमित्र पुरस्कार
प्रवीण निकम ,फलटण हल्ली मुक्काम पुणे
प्रसिद्ध समाज सेवक देवाजी तोफा, शिक्षणमित्र प्रवीण निकम ,स्वप्नील चव्हाण, श्रीकांत ढेरंगे, पवन भगत , डॉ. संजय बोरुडे आणि डॉ. अनुराधा नेरूरकर या सर्वांचे त्यांच्या त्यांच्या कार्यातील मनोगतात्मक चिंतन रसिकांच्या काळजाचा ठाव घेऊन गेले.
प्रा. गिरीश सपाटे यांनी निवड प्रक्रियेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे, ॲड.लखनसिंह कटरे, डॉ. जयश्री सातोकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक विवेक कापगते यांनी केले. सूत्रसंचालन वीणा डोंगरवार आणि आभार प्रदर्शन प्रा. नरेश आंबिलकर यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन साहित्यिक व चित्रकार प्रमोदकुमार अणेराव यांनी केले होते.