वाचनकट्टा साहित्य पुरस्कार २०२२ जाहीर
कोल्हापूर : वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था, कोल्हापूर या संस्थेच्यावतीने सन २०२२ पासून वाचनकट्टा साहित्य पुरस्कार देण्यात येत आहेत. यानुसार सन २०२२ चे पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष युवराज कदम व मुख्य समन्वयक प्राचार्या रेखा निर्मळे-चौगुले यांनी कळविले आहे.
या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबरी, समीक्षा, संशोधन, आत्मकथन आणि आध्यात्मिक प्रकारासाठी सन २०२०-२०२१ साली प्रकाशित करण्यात आलेली पुस्तके मागविण्यात आली होती. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून जवळपास १६९ साहित्यकृती प्राप्त झाल्या. परीक्षक म्हणून ज्येष्ठ लेखिका प्रा. हेमा गंगातीरकर, ज्येष्ठ कवी चंद्रकांत पोतदार, प्रा. डॉ. सुजय पाटील, लेखिका शर्मिष्ठा ताशी यांनी काम पाहिले. या पुरस्कारांचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि यथोचित रक्कम असणार आहे..
उत्कृष्ट पद्य साहित्य पुरस्कार –
कविता
प्रथम (विभागून) –
आबासाहेब पाटील, बेळगांव (घामाची ओल धरून)
व
प्रा. प्रतिभा सराफ, मुंबई (उमलावे आतुनीच)
द्वितीय (विभागून) –
डॉ. आनंद बल्लाळ, गडहिंग्लज (स्वातंत्र्यानंतर आजही)
व
सौ. वैष्णवी अंदूरकर, कोल्हापूर (एकेकटे सोबत)
उत्कृष्ट गद्य साहित्य पुरस्कार-
कादंबरी
प्रथम – नंदू साळोखे, कोल्हापूर (इपळाप)
द्वितीय – इला माटे, कोल्हापूर (अजन्माच्या जन्मकळा)
कथा
प्रथम- सुनील मंगेश जाधव, पालघर (मी आहे)
द्वितीय – प्रेमनाथ रामदासी, सोलापूर (फ्युचर मॅन)
बालसाहित्य
सुनील पांडे, पुणे (टॉकी आणि टॉमी)
उत्कृष्ट संशोधन साहित्य पुरस्कार –
प्रथम – डॉ. सुवर्णा निंबाळकर, पुणे
(करवीर छत्रपती इंदुमती राणीसाहेब)
द्वितीय – डॉ. राजेंद्र रंगराव राऊत, अमरावती (लीळाचरित्र )
उत्कृष्ट संकीर्ण साहित्य पुरस्कार-
वैचारिक
प्रथम – वासंती प्रकाश घाडगे, सातारा (चला लडाखला)
द्वितीय- विनायक शशिकांत होगाडे, इचलकरंजी (डियर तुकोबा)
अध्यात्म – गायत्री मुळे, नागपूर (परब्रह्म)
विशेष साहित्य सन्मान – २०२२
श्री. गणपत हरी पाटील, कोल्हापूर
डॉ. सुनीता चव्हाण, मुंबई
श्री. अजितसिंह चव्हाण, कराड
श्री. मनोहर महादेव भोसले, कोल्हापूर
डॉ. उत्तम सकट, कोल्हापूर
डॉ. मोहन लोंढे, सांगली
प्रा. आनंद गिरी, कोल्हापूर
डॉ. सयाजीराव गायकवाड, सोलापूर
डॉ. महादेव शिंदे, कोल्हापूर