आम्ही विश्व लेखिका हे कराड येथील पत्रकार स्व. मोहन कुलकर्णी यांना पडलेलं एक गोड स्वप्न आहे. जे त्यांनी प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला. लिहा व लिहित्या व्हा हे ब्रीदवाक्य घेऊन अनेक महिलांना त्यांनी लिहिण्यासाठी प्रोत्साहित केले. महिलांचे भव्य साहित्य संमेलन घ्यायचे त्यांच्या मनात होते पण नियतीने त्यांच्यावर घाला घातला. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट ला त्यांचे निधन झाले. त्यामुळे आम्हा लेखिकांच्या घोडदौडीला लगाम बसला. त्यानंतर लगेचच संस्थेच्या संचालिका सुनीला मोहनदास यांचेही निधन झाले. त्यामुळे पुढे काय करायचे हे ठरवण्यात काही काळ गेला.
2018 पासून ऋतुजा उमेश कुळकर्णी व सुनेत्रा विजय जोशी या संस्थेच्या आजीव सभासद आहेत. मोहनकाकांच्या निधनानंतर ठाणे येथील प्रा. पद्मा हुशिंग यांनी मोहन काकांच्या पत्नी मंजिरी कुलकर्णी यांच्या साहाय्याने हा डोलारा उचलण्याचे ठरवले. त्यांना साथ मिळाली प्रा. विजया मारोतकर यांची. त्यानुसार आम्ही विश्व लेखिका असे नामकरण होऊन या चळवळीची वाटचाल चालू झाली. ही संस्था येत्या काही दिवसातच रजिस्टर होईल. प्रा. विजयाताई वाड या संस्थेच्या मुख्य सल्लागार आहेत. या संस्थेचे विभागवार समूह असून व्हाट्सएपच्या माध्यमातून त्यांचे उपक्रम चालतात. महत्वाचे उपक्रम आम्ही विश्व लेखिका या फेसबुक पेजवर चालतात. लेख, कविता, कथा , उखाणे, वृत्तबद्ध कविता, ई बुक अशा विविध स्वरूपात हे उपक्रम होतात.
आपल्या कोकण विभागातून अनेक महिला दैनंदिन लिखाण व्हाट्सएप ग्रुपवर करत आहेत. फेसबुकवर उत्तम सादरीकरण करत आहेत. कोकणातील कार्यकारिणी एका कार्यक्रमाद्वारे जाहीर झाली. त्यात कोकण विभाग जिल्हा अध्यक्षा म्हणून सुनेत्रा विजय जोशी तसेच उपाध्यक्षापदी मुग्धा कुळ्ये यांची आणि कार्याध्यक्षा म्हणून ऋतुजा उमेश कुळकर्णी यांची निवड झाली.
अन्य कार्यकारिणी अशी – कश्मिरा पालेकर (सचिव), उमा देवळे (खजिनदार), सदस्या- अनुप्रीता कोकजे, अमृता नरसाळे, अनुराधा दीक्षित (वाडा, देवगड, जि. सिंधुदुर्ग), अंजली मुतालिक (कुडाळ, जि. सिंधुदुर्ग), निमंत्रक – आकांक्षा भुर्के.
ज्या महिलांना साहित्याची आवड आहे त्यांनी या समूहात नक्की यावे, असे आवाहन कोकण विभाग अध्यक्षा सुनेत्रा विजय जोशी यांनी केले आहे. तसेच या समूहात सहभागी होण्यासाठी ऋतुजा उमेश कुळकर्णी यांच्याशी 7020789841 या क्रमांकावर संपर्क करावा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.