April 25, 2024
Ashwamegha Granthalaya Award Satara
Home » अश्वमेध ग्रंथालयाचे अक्षर गौरव साहित्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

अश्वमेध ग्रंथालयाचे अक्षर गौरव साहित्य पुरस्कार जाहीर

सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय यांचे वतीने दरवर्षी दिले जाणारे राज्यस्तरीय “कै भास्करराव माने स्मृत्यर्थ, अक्षर गौरव साहित्य पुरस्कार २०२१” जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक किशोर बेडकिहाळ यांचे हस्ते व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष व साहित्यिका सुनिताराजे पवार यांचे प्रमुख उपस्थितीत रविवारी ( ता. २१ ऑगस्ट २०२२) सायंकाळी साडेपाच वाजता सातारा येथील पाठक हॉलमध्ये होणार आहे, अशी माहिती अश्वमेध ग्रंथालयाचे संस्थापक, माजी सभापती रविंद्र भारती- झुटिंग यांनी दिली आहे.

पुरस्कारांचे हे दहावे वर्ष आहे. अश्वमेध ग्रंथालय वाचन संस्कृती वृद्धिगत व्हावी म्हणून साहित्य उपक्रम घेत असते.

कै. भास्करराव माने स्मृत्यर्थ “अक्षर गौरव साहित्य पुरस्कार २०२१” चे विजेते असे :

१. नोटबंदी – लेखक दि. बा. पाटील – कथासंग्रह
२. आदिवासींचेही डॉ बाबासाहेब आंबेडकर – डॉ तुकाराम रोंगटे – संशोधन
प्रत्येकी २५०० रु व स्मृतीचिन्ह

कै. भास्करराव माने स्मृत्यर्थ “अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार २०२१” चे विजेते असे :

१. कविवर्य नारायण सुर्वे मास्तरांचे विद्यापीठ – . उध्दव कानडे / पुरुषोत्तम सदाफुले – संपादन संग्रह
२. वात्सल्यसूक्त – प्रकाश जडे – काव्यसंग्रह
३. गुंता – राजन लाखे – ललित लेखसंग्रह
प्रत्येकी १००० रु व स्मृतीचिन्ह

कै. भास्करराव माने स्मृत्यर्थ “अक्षर गौरव साहित्य प्रेरणा पुरस्कार २०२१” (सातारा जिल्ह्यातील लेखकांसाठी)

१. संविधानाच्या स्वप्नातलं गाव – डॉ. सुभाष वाघमारे काव्यसंग्रह
२. भूतान एक आनंदयात्रा – राजेंद्र वाकडे – प्रवासवर्णन
३. मन सांधते आभाळ – मनिषा शिरटावले – काव्यसंग्रह
प्रत्येकी ५०० रु व स्मृतीचिन्ह

डॉ. श्रीकांत कारखानीस स्मृत्यर्थ, आरोग्य विषयक पुस्तकासाठी दिला जातो. हा पुरस्कार लेखक दिपक प्रभावळकर यांच्या कोविडायन डायरी ऑफ पेन्डॅमिक पुस्तकास देण्यात येणार आहे. १००० रुपये व स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहेय

या वर्षी परिक्षक म्हणून डॉ. राजेंद्र माने, सचिन प्रभुणे, कांता भोसले यांनी काम पाहीले. तरी या कार्यक्रमास सर्व साहित्यप्रेमींनी आवर्जुन उपस्थित रहावे अशी विनंती लेखक व ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष डॉ राजेंद्र माने व ग्रंथालयाचे अध्यक्ष, शशिभूषण जाधव यांनी केली आहे.

Related posts

आता सोशल मिडीयावर वक्रनजर…

मानो या न मानो…

जाणून घ्या सदानंद कदम यांना सांगाती हा ग्रंथ का लिहावासा वाटला…

Leave a Comment