July 2, 2022
Evergreen Love Poem BY Sunetra Joshi
Home » प्रेम चिरंतन…
कविता

प्रेम चिरंतन…

प्रेम चिरंतन

नजरेत नजर गुंतत आहे 
प्रेम कदाचित सांगत आहे.. 
सांग तुलाही आवडतो ना
प्रेम मला ती मागत आहे... 

उभा घेऊनी गुलाब हाती
मला वाटते गंमत आहे... 
होशील सखे का माझी तू 
मी ही त्याला सहमत आहे 

जवळ येऊन मिठीत घेता
मोर मनाचा थिरकत आहे... 
तव ओठांनी अधर चुंबिता
श्वासात श्वास उतरत आहे... 

रंग उडाला चर्येवरचा 
जगास सारे समजत आहे.. 
तितके तितके जगास कळते
जितके मी ते लपवत आहे... 

स्वप्न गुलाबी पडू लागली
आयुष्याला रंगत आहे... 
युगायुगांची अशी प्रतिक्षा
क्षणात आता संपत आहे...
 
व्यक्त कराया प्रेम भावना 
दिवस आजचा साधत आहे... 
धडधडणारे  हृद्य सांगते
प्रेम चिरंतन श्वाश्वत आहे... 

सौ सुनेत्रा विजय जोशी
रत्नागिरी.

Related posts

नवयुवकांना दिशा देणारा झाडीबोलीतील कवितासंग्रह : खंजरी

येळकोट

गंध पावसाचा…

Leave a Comment