तख्त राखणार ही
कोणाचे किती किती
दिल्लीच्या तख्तावर
बघू मराठी कधी
अमृताशी जिंकून पैजा
वाट्याला काय तिच्या
राज्य तिच्या नावाने
वाट्याला काय हिच्या
मिरवतो, फिरवतो
द्वाहीच फक्त तो
नावाने तिच्या
सत्ता जो भोगतो
तोंडदेखले तिचे
करून फक्त सोहळे
ठेऊनी गहाण तिजला
राज्य करणाराच निजला
मागू नका रे जोगवा
भीकही मागू नका
याचनाही फार झाली
वंचना साहू नका
जागवा रे जागवा
खदखदा हलवून यांना
मिळणार नाही मत एकही
ठणकावूनी सांगा तयांना
ऐकावयाला तितकीच येते
ही मराठी जयांना, भरभरून
देते जशी,दाखवा ना एकदा
काढूनही नेते कशी
होत हुजरेच नुसते
मुजरेच फक्त करू नका
तख्तही ते तयांचे
मराठी वाकवून मागते
ही मराठी आज अपुला
अधिकार आहे मागते
भीक नाही, आपले
तख्त आहे मागते