📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
November 3, 2026
काय चाललयं अवतीभवती

बार्शीत २० वे महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलन

बार्शीत २२ नोव्हेंबर २०२६ रोजी २० वे महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलन होणार आहे. फुलचंद नागटिळक संमेलनाध्यक्ष तर डॉ. बी. वाय. यादव स्वागताध्यक्ष म्हणून निवडले.

फुलचंद नागटिळक संमेलनाध्यक्ष तर डॉ. बी. वाय. यादव स्वागताध्यक्ष

बार्शी – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित २० वे अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी बार्शी (जि. सोलापूर) येथे होणार असल्याची माहिती परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी दिली.

या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व सत्यशोधक चळवळीचे अभ्यासक फुलचंद नागटिळक यांची तर स्वागताध्यक्षपदी बार्शीतील सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. वाय. यादव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

या संमेलनाच्या नियोजनासाठी बार्शी येथे डॉ.गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीतच या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी साहित्य परिषदेचे विश्वस्त अनिल अनभुले, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. हनुमंत चिकणे, ज्येष्ठ साहित्यिक जयकुमार शितेळे ,विलास जगदाळे ,मदन जगताप उपस्थित होते.

असे असेल संमेलनाचे स्वरूप –

सकाळी पारंपरिक ग्रंथपूजनाने संमेलनास प्रारंभ होईल. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भव्य उद्घाटन समारंभ होईल. दिवसभरात महात्मा फुले यांच्या विचारांवर आधारित वैचारिक परिसंवाद, खुले अधिवेशन आणि सायंकाळी महाराष्ट्रातील नामवंत कवींच्या सहभागाने बहारदार कविसंमेलनाने संमेलनाची सांगता होणार आहे.

महात्मा जोतिबा फुले यांचे समता, बंधुता, शिक्षण आणि सत्यशोधक विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि मराठी साहित्यातून प्रबोधनाची चळवळ अधिक गतिमान करणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ. गोरे यांनी सांगितले. या संमेलनास राज्यभरातून ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि हजारो साहित्य रसिक उपस्थित राहणार आहेत.

Related posts

साताऱ्याच्या अश्वमेध ग्रंथालयाचे 2023 चे साहित्य पुरस्कार जाहीर

चित्रकार वासुदेव कामत यांना मराठी यशवंत पुरस्कार

महाराष्ट्र व गुजरात राज्ये भिन्न परंतु आत्मा एक : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

Leave a Comment

Leave a review

    श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406