April 20, 2024
Pune Nigadi Matrumandir Sant Wandmay award
Home » मातृमंदिरचे संत वाङ्मय पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

मातृमंदिरचे संत वाङ्मय पुरस्कार जाहीर

निगडी येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे दरवर्षी संत वाड्.मय पुरस्कार देण्यात येतात. यंदा या उपक्रमाचे २४ वे वर्ष आहे. यंदाच्यावर्षीसाठी एकूण ३६ पुस्तके परीक्षणासाठी संस्थेकडे आली होती. याचे परीक्षण डॉ. सौ. रंजनाताई दाते आणि डॉ. सौ. आरतीताई दातार या दोन परीक्षकांनी केले. त्यानुसार पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कार प्राप्त लेखकास ६० टक्के व पुस्तकाच्या प्रकाशकास ४० टक्के रक्कम देण्यात येते, अशी माहिती कार्यवाह म. व. देवळेकर यांनी दिली आहे.

पुरस्काराचे वितरण सौर १ अग्रहायण शके १९४४ मंगळवारी ( २२ नोव्हेंबर) रोजी सकाळी ११ वाजता ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या मनोहर सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अभ्यागत म्हणून डॉ. सदानंद मोरे हे उपस्थि राहणार आहेत, असेही देवळेकर यांनी सांगितले.

परीक्षकांनी एकविचाराने दिलेल्या निर्णयानुसार पुरस्कार प्राप्त विजेते असे –

गट क्र. १- चिंतनपर, विवेचनपर पुरस्कार

प्रथम क्रमांक (पुरस्कार रक्कम रु.८,०००/-) – जावे संतांचिया गावा. लेखक : डॉ. लीला गोविलकर, सावेडी, अहमदनगर. प्रकाशक : आनंदघन प्रकाशन, नवी मुंबई .
द्वितीय क्रमांक (पुरस्कार रक्कम रु.६,०००/-) – हरिनाम संकीर्तन ; प्रक्रिया आणि सामर्थ्य, लेखक : शिरीष शांताराम कवडे, पुणे. प्रकाशक : श्रीवामनराज प्रकाशन, पुणे.
तृतीय क्रमांक (पुरस्कार रक्कम रु. ४,०००/-) – गौळण वाङमय आणि स्वरूप, लेखक : डॉ. रामचंद्र देखणे ,पुणे. प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन्स ,पुणे.

विशेष पुरस्कार (पुरस्कार रक्कम रु.३,००० ) फक्त लेखकासाठी
१. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी – लेखक : सौ. मनीषा भास्कर अभ्यंकर, मिरज. प्रकाशक : जीवन रामचंद्र जोशी, कोल्हापूर .
२. संजीवनी रामायण – लेखक : अनंत ज्ञानोबा घोळवे, कागल. प्रकाशक : श्री. एन. एम. मधाळे, सूर्यचंद्र प्रकाशन ,कागल.

गट क्र. २ – चरित्र, परिचय, संकलनात्मक, ललित साहित्य प्रकाशक

१. संत जनाबाई साहित्य नभांगणातील चमकता तारा, लेखक : डॉ. सौ. सुमंगला विजय बाकरे, पुणे. प्रकाशक : अक्षर दालन , कोल्हापूर .
२. ज्ञानसूर्याचे आकाश संत निवृत्तीनाथ – लेखक : मंजुश्री नंदकुमार गोखले , कोल्हापूर . प्रकाशक : सकाळ मीडिया प्रा. लि. , पुणे .
३. विभागून
१. जाणून घेऊ भगवद्गीता – लेखक : डॉ. सौ. रजनी पतकी, पुणे. प्रकाशक : अशोक कुंभोजकर , पुणे.
२. मुलांसाठी ज्ञानेश्वरी – लेखक : सौ. शैलजा मुकुंद सबनीस, कराड, सातारा. प्रकाशक : श्रीमती वैशाली प्रताप कुलकर्णी , सिंधू प्रकाशन , कोल्हापूर,

४. विभागून
१. दत्तसंप्रदायातील त्रिमूर्ती – लेखक : अनुराधा फाटक , चिंचवड ,पुणे. प्रकाशक : राहुल प्रताप कुलकर्णी, रावा प्रकाशन, कोल्हापूर,
२. संचिताचे शारंगपाणी – लेखक : डॉ. मार्तंड दिवाकरराव कुलकर्णी ,किनवट नांदेड. प्रकाशक : युवराज भटू माळी, अथर्व पब्लिकेशन्स, धळे.

Related posts

छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन येथे होणार १२ मार्चला

मुलांना प्रेमाने जिंकता आले तर…

हरभरा लागवडीचे तंत्र…

Leave a Comment