📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
November 2, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नागपूर विद्यापीठ कुलगुरूपदी क्षीरसागर तर राहुरीत खर्चे

Dr Manali Kshirsagar and Dr Vilas Kharche appointed as Vice-Chancellors of RTM Nagpur University and MPKV Rahuri

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ मनाली क्षीरसागर; तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ विलास खर्चे यांची नियुक्ती

मुंबई – राज्यपाल तथा कुलपती आचार्य देवव्रत यांनी डॉ मनाली मकरंद क्षीरसागर यांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड जाहीर केली. डॉ मनाली क्षीरसागर या यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय येथे संचालिका (तांत्रिक) व सल्लागार पदावर कार्यरत आहेत.

एका स्वतंत्र आदेशाद्वारे राज्यपाल देवव्रत यांनी डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील माजी संशोधन संचालक डॉ विलास काशिनाथ खर्चे यांची राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे.

दोन्ही कुलगुरूंच्या नियुक्त्या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची पासष्ट वर्षे पूर्ण करतील, यापैकी जी तारीख अगोदर असेल त्या तारखेपर्यंत असतील.

Related posts

शाहुवाडीमध्ये आढळला दुर्मिळ ‘पिवळ्या काटेसावरीचा वृक्ष’

निसर्गसंपदा ही विदर्भाच्या पर्यटनक्षेत्राची ताकद

जलक्रांतीचा योद्धा जलनायक सुधाकरराव नाईक

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406