June 28, 2022
Zhadiboli Literature award delecared by Zhadiboli Sahitya Mandal
Home » झाडीबोली साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

झाडीबोली साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

  • १२ ते १३ मार्च 2022 ला जुनासुर्ला येथे 29 वे झाडीबोली साहित्य संमेलन
  • झाडीबोली साहित्यकृतींना साहित्यरत्न आणि साहित्यभूषण पुरस्कार देण्याचा निर्णय
  • कवितासंग्रह, कादंबरी, समीक्षण, शोधनिबंध, ललीतलेखन, बालकाव्य, कथासंग्रह आदींचा पुरस्कारात समावेश

झाडीबोली साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेच्या वतीने साहित्य संमेलन आयोजित केले जाते, या वर्षी २९ वे झाडीबोली साहित्य संमेलन जुनासुर्ला ( ता. मूल जि. चंद्रपूर) येथे १२ व १३ मार्च २०२२ रोजी होणार आहे. या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या वर्षी साहित्यकृतींना साहित्यरत्न आणि साहित्यभूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे.

देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप असे –
१) कादंबरी – १००० /-रोख ,शाल , प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह
२) उत्कृष्ट काव्यसंग्रह – १००० /- रोख ,शाल , प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह
३) उत्कृष्ट समीक्षण – १००० /- रोख ,शाल , प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह
४) उत्कृष्ट शोधप्रबंध – १००० /- रोख ,शाल , प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह
५) उत्कृष्ट ललीतलेख/स्फुटलेखन – १००० /-रोख ,शाल , प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह
६) उत्कृष्ट बालकाव्य – १००० /- रोख ,शाल , प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह
७) उत्कृष्ट कथासंग्रह – १००० /-रोख ,शाल , प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह

या पुरस्कारासाठी गेल्या पाच वर्षांत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा विचार केला जाणार आहे. तरी इच्छुक साहित्यिकांनी गेल्या पाच वर्षांत प्रकाशित झालेले आहे असे साहित्य पाठवावे. या पुरस्कारासाठी पुस्तकाच्या दोन प्रती, दोन फोटो आणि संक्षिप्त परिचय १ मार्च २०२२ पर्यंन्त पोहोचेल अशा रितीने झाडीबोली साहित्य मंडळ, जुनासुर्ला, ता. मूल, जि. चंद्रपूर ४४१२२८ या पत्यावर पाठवावेत, असे आवाहन झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे . पुरस्कारासाठी आलेले सर्व ग्रंथ जुनासुर्ला येथे नव्याने सुरु होत असलेल्या वाचनालयात ठेवण्यात येणार आहेत. तसेच ज्यांची साहित्य कृती मिळेल त्यांना आयोजन समितीच्यावतीने ऑनलाईन सन्मानपत्र देण्यात येणार आहे.

Related posts

पिपिलिका मुक्तिधाम ही मराठीतील पहिली उत्तर आधुनिक कादंबरी – डॉ. आनंद पाटील

दमसाच्या ग्रंथ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

शेकडो वर्षांच्या गुलामगिरीत पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरवण्याची वेळ – नरेंद्र मोदी

Leave a Comment