- मुंबई मराठी साहित्य संघाचे पुरस्कार जाहीर
- वितरण शनिवारी गिरगाव साहित्य संघाच्या भालेराव नाट्यगृहात
मुंबई – येथील मराठी साहित्य संघाचा ८९ वा वर्धापनदिन शनिवारी ( ता. २६ ऑक्टोबर २०२४) साजरा होत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नामवंत चित्रकार वासुदेव कामत हे असून त्यांना मराठी यशवंत पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. २५ हजार रुपये, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून तो साहित्य संघाच्या अध्यक्षा अचला जोशी यांच्या हस्ते देण्यात येईल, अशी माहिती साहित्य संघाच्या साहित्य शाखेचे कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी दिली आहे.
‘मी, चित्रकला आणि चित्रांची भाषा’ या विषयावर श्री. कामत यावेळी आपले विचार मांडतील. सायंकाळी ५.३० वाजता गिरगावातील साहित्य संघाच्या भालेराव नाट्यगृहात हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी साहित्य संघाचे मुखपत्र असलेल्या साहित्य दिवाळी विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात येईल.
समारंभात साहित्य संघाच्या उषा तांबे, अश्विनी भालेराव, प्रकाश पागे आणि अशोक बेंडखळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार. यावेळी प्रमुख पाहुणे वासुदेव कामत यांच्या हस्ते बारा साहित्य पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
साहित्य पुरस्कार असे – :
१. सहचारिणी पुरस्कार : श्रीमती निर्मला जयंत सावरकर (डॉ. भालेराव आणि कुटुंबीय पुरस्कृत),
२. कै. लक्ष्मीकांत बाबुराव चंद्रगिरी पुरस्कार : श्रीमती सुप्रिया राज (काश्मिरियत) ( कै. शरयू चंद्रगिरी पुरस्कृत – प्रवास वर्णनपर पुस्तकासाठी ),
३. बालसाहित्य पुरस्कार : डॉ. सुरेश सावंत (आभाळमाया) (कै. मिलिंद गाडगीळ स्मरणार्थ, श्रीमती वासंती गंगाधर गाडगीळ न्यास पुरस्कृत)
४. कथाकार शांताराम पुरस्कार: श्री. लक्ष्मण दिवटे (उसवण) (के. ज. पुरोहित पुरस्कृत लघुकथा संग्रह पुरस्कार),
५. वैचारिक साहित्य पुरस्कार : श्री. केशवचैतन्य कुंटे (भारतीय धर्मसंगीत) (रा. भि. जोशी स्मृतीप्रित्यर्थ, नीलिमा भावे पुरस्कृत),
६. वि. पु. भागवत प्रकाशन पुरस्कार : श्री. सचिन उपाध्याय (विजय प्रकाशन),
७.(कै.)के. नारायण काळे स्मृती पुरस्कार: श्री. अभिराम भडकमकर ( प्रतिमा काळे पुरस्कृत – नाट्यविषयक कार्यासाठी ),
८.(कै.) माधव जूलियन स्मृती पुरस्कार : श्री. पंकज भोसले (ज्युथिका पाटणकर पुरस्कृत – मराठी भाषा विषयक कार्यासाठी),
९. परुळेकर स्मृती पुरस्कार- (संत साहित्याच्या अभ्यासकासाठी)-श्री. अनिल सहस्रबुद्धे (श्री. प्रकाश पागे पुरस्कृत),
१०. साहित्य गौरव पुरस्कार : श्रीमती शकुंतला मुळये (मुद्रित शोधक),
११. मनुकाका पंडित संस्था कार्यकर्ता पुरस्कार : श्री. भिकू बारस्कर,
१२. क्रीडा पत्रकार पुरस्कार : विनायक राणे.
रोख रक्कम, सन्मान पत्र आणि पुस्तक भेट असे या सर्व पुरस्कारांचे स्वरूप आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
