October 19, 2024
Know the different short forms used in revenue accounts
Home » Privacy Policy » जाणून घ्या, महसुल खात्यात वापरले जाणारे वेगवेगळे शॉर्टफॉर्म
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

जाणून घ्या, महसुल खात्यात वापरले जाणारे वेगवेगळे शॉर्टफॉर्म

यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांच्या रंग महसूली या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी ( १९ ऑक्टोंबर २०२४ ) पुणे येथे होत आहे. या निमित्ताने या पुस्तकातील एक भाग…

महसुली शॉर्टफॉर्म

महसुली परिभाषा गेल्या 150 वर्षात एवढी रुळली आहे की टिप्पणी लिहिणाऱ्या लिपिक, अव्वल कारकून, तहसिलदार, इत्यादींच्या पूर्ण अंगवळणी पडली आहे. इतर राज्यातून विशेषत: नव्याने रुजू झालेल्या आय. ए. एस. अधिकाऱ्यांना हे शॉर्टफॉर्म अगदी अनाकलनीय वाटतात !

विदर्भात अशाच एका सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यापुढे ऑडीट परिच्छेदांबद्दल टिप्पणी सादर झाली त्यामध्ये मुद्दे नमूद करुन त्यापुढे ‘हु हु ची पु. पु. केली’ असे शब्द लिहून सह्या केल्या होत्या. विचारणा केल्यावर ‘हुजुर हुकूमाची पुर्ण पुर्तता केली !’ असा खुलासा झाला.
महसुल खात्यात असेच वेगवेगळे शॉर्टफॉर्म फाईलवर दिसतात !

• हु. मू. नु. – हुजुर मर्जी नुसार (टिप्पणी मध्ये)
• पू. सू – पुढील सुनावणी (केसेसच्या रोजनाम्यावर)
• दा. ता. – दाखल तारीख (टपालावर)
• द. दा. – दफ्तरी दाखल (फाईल/ टपाल दफ्तरी दाखल करण्यासाठी)
• नि. स. प्र. – नियंत्रित सत्ता प्रकार
• द. क. खोत – दर साल कबुलायत खोत
• सं. कु – संरक्षित कुळ
• सा. कु – साधे कुळ
• खु – खुद्द
• र – रयतावा
• भ्र – भ्रतार उदा. अनुताई भ्र. पर्वतराव पाटील – (जिवंतपणी / हयातपणी)
• नो. रु. नो. म – नोटीस रुजु नोंद मजूर
• क. जा. प – कमी जास्त पत्रक
• खु || – खुर्द
• बु || – बुद्रुक
• गुदस्ता – मागील वर्षाप्रमाणे
• त. र. – तक्रार रजिस्टर
• स. न. – सर्व्हे नंबर
• ग. न. – गट नंबर
• दे. इ. वर्ग – देवस्थान इनाम वर्ग
• मे. जा. व्हा – मेहेरबान जाहीर व्हावे
• कु. का. – कुळकायदा
• पु. ता – पुढील तारीख
• गंभा – (विधवा स्त्रीच्या नावाअगोदर) गंगाभागीरथी
• कोम – उदा. सुंदराबाई कोम शंतनुराव पुरोहीत (विधवा सुंदराबाई)
• मे. जा. व्हावे – मेहेरबानास जाहीर व्हावे
• न. अ. श – नवीन अविभाज्य शर्त
• पो. पा. – पोलीस पाटील
• गु. द. – गुदरलेल्या दस्ताप्रमाणे
• का. वि. – कार्यविवरण
• क. धा. क. – कब्जा धारण करणार
• नो ब. – नोटीस बजावली
• अ. का. – अव्वल कारकून
• भाप्रसे – भारतीय प्रशासन सेवा
• अशापत्र – अशासकीय पत्र
• अमुस – अप्पर मुख्य सचिव
• नो. ब. त. ना. नो. मं – नोटीस बजावली, तक्रार नाही. नोंद मंजुर
• ए. कु. मॅ/ ए. कु. म्या – एकत्र कुटुंब मॅनेजर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading