पत्रकार
राजकारण ,समाजकारण
प्रत्येक क्षेत्रात पाऊल त्याचं
जातीपातीच्या सीमा ओलांडून
प्रत्येक देव न देऊळ त्याचं |
केव्हा कुठे काय घडतंय
सतर्कतेसाठी धडपड सारी
पत्रकार राजा काय सांगू
तुझी कहाणी न्यारी.. |
पत्रकार एक योद्धा अन्
लेखणी त्याची शस्त्र
जगाची खबर घराघरात देतो
देऊन वृत्तपत्र ….|
क्रिडा, शिक्षण,आरोग्य, संरक्षण,
असे त्याचे सारे क्षेत्र
हीन- दीन, गरीब अन् लाचार
मानतात सारेच ज्याला मित्र |
शेतकऱ्यांचा आवाज होऊन
त्यांच्यासाठी लढतो
ऊन- पाउस, वादळ वारा
अन् संकटेही झेलतो |
निस्वार्थपणाने अन्यायाला
वाचा तोच फोडतो
सत्यतेचा घेऊन आढावा
भ्रष्टाचाऱ्यांशी भिडतो |
कवी – मनोहर गोपाळ झोरे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.