इचलकरंजी – येथील संस्कृती प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी लक्ष्मण कांबळे (जिंदा) स्मृती पुरस्कार कादंबरी, कथा आणि काव्य या साहित्य प्रकारातील ग्रंथांना देण्यात येतात. या वर्षीच्या पुरस्कारासाठी जानेवारी २०२० ते ऑक्टोंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेले कादंबरी, कथा, काव्य ग्रंथ मागविण्यात आले आहेत. तरी साहित्यिकांनी पुस्तकाची एक प्रत १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत पाठवावी असे आवाहन संस्था अध्यक्ष महावीर कांबळे यांनी केले आहे.
कादंबरी,कथा, काव्य या तीनही साहित्य प्रकारातील एका उत्कृष्ट ग्रंथाला हा पुरस्कार देण्यात येणार असून प्रत्येकी पाच हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ भेट असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मराठी साहित्यातील मान्यवर साहित्यिकांच्या परीक्षण समितीतर्फे पुरस्कारासाठी ग्रंथांची निवड करण्यात येणार आहे.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
पंडीत बापू कांबळे, ३/४५९/२.गुरूकुल कॉलनी टाकवडे रोड, इचलकरंजी (कोल्हापूर) ४१६११५, अधिक माहितीसाठी संपर्क मोबा.-८३२९७९८३३६,९१४६१०६६८८.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.