महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि तळेगाव येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्यावतीने ३१ वा राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सव १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी दिली. या निमित्ताने गदिमा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कविता महोत्सवामध्ये नारायण पुरी, भरत दौंडकर, लता ऐवळे, अरूण पवार, प्रशांत केंदळे, सुहास घुमरे या कविता निमंत्रित करण्यात आले आहे. या निमित्ताने देण्यात येणारे पुरस्कार असे –
गदिमा जीवनगौरव सन्मान ज्येष्ठ कविवर्य अशोक नायगांवकर यांना तर काव्यप्रतिभा पुरस्कार जालना येथील ज्येष्ठ कवयित्री संजीवनी तडेगावकर तर लोककला पुरस्कार कुटूंबाडी येथील वर्षा मुसळे यांना देण्यात येणार आहे.
गदिमा दिवाळी अंक पारितोषिकांचे वितरणही यावेळी करण्यात येणार आहे. संदीप तापकीर यांच्या दुर्गांच्या देशातून या दिवाळी अंकास प्रथम क्रमांक तर पल्लवी परुळेकर-बनसोडे यांच्या अधोरेखित या दिवाळी अंकास द्वितीय क्रमांक व स्वाती पिंगळे यांच्या शब्दाई या दिवाळी अंकास तृतीय क्रमांक देण्यात आला आहे.
गदिमा साहित्य पुरस्कारांचेही वितरण यावेळी होणार आहे. कविता संग्रहासाठी दत्तात्रय जगताप (शिरुर) यांच्या तू फक्त बाई नाहीसा, संतोष आळंजकर (औरंगाबाद) यांच्या हंबरवाटा, प्रभाकर साळेगावकर ( माजलगाव ) यांच्या प्रसन्न प्रहार, प्रा. अलका सपकाळ (धाराशीव) यांच्या वादळ झेलताना, प्रा. डॉ. संभाजी मलघे (भोसरी) यांच्या अस्वस्थ भवताल व आबिद शेख (पुसद) यांच्या चोचीमधील दाणे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
कादंबरीसाठी देण्यात येणारा मृत्युंजय साहित्य पुरस्कार खुलताबाद येथील भाऊसाहेब मिस्तरी यांच्या रंधा कादंबरीस व परभणी येथील बा. बा. कोटबे यांच्या तिटा कादंबरीस देण्यात येणार आहे.
गदिमा काव्यस्पर्धा पारितोषिकांचेही वितरण यावेळी होणार आहे. यामध्ये पांडुरंग बाणखेले (प्रथम), अनिल नाटेकर (द्वितीय), जयश्री श्रीखंडे (तृतीय), वसंत घाग व आय. के. शेख (उत्तेजनार्थ) यांना सन्मानित करण्यात येणार आहे. इंजि. शिवाजी चाळक यांना कविराज उध्दव कानडे स्मृती केशरमाती काव्य पुरस्कार देण्यात येणार आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.