March 19, 2025
Home » ICAR

ICAR

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हवामानास अनुकूल आणि जैवसंवर्धन केलेल्या 109 वाणांचे वाटप 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत सुपीक, हवामानास अनुकूल आणि जैव संवर्धन करणाऱ्या पिकांच्या 109 वाणांचे केले वाटप नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याआधी आज नवी दिल्लीतल्या भारत कृषी संशोधन संस्था येथे पिकांच्या  अत्यंत सुपीक, हवामानास अनुकूल आणि जैवसंवर्धन केलेल्या 109 वाणांचे वाटप केले. पंतप्रधानांनी यावेळी शेतकरी आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधला. या नवीन पिकांच्या वाणांच्या महत्त्वाबाबत चर्चा करताना पंतप्रधानांनी कृषी क्षेत्रात मूल्यवर्धनाच्या महत्त्वावर भर दिला. ही नवीन वाणे अत्यंत फायदेशीर ठरतील, कारण त्यामुळे आपला शेतीमधील खर्च कमी होण्यास मदत होईल आणि पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी बाजरीच्या महत्त्वावर चर्चा केली तसेच लोक आता पौष्टिक आहाराकडे कसे वळत आहेत हे अधोरेखित केले. नैसर्गिक शेतीचे फायदे आणि सेंद्रीय शेतीबद्दल सामान्य लोकांचा वाढता विश्वास याबद्दलही त्यांनी सांगितले. लोक सेंद्रीय पदार्थांचे सेवन आणि मागणी करू लागले आहेत असेही ते पुढे म्हणाले. नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या प्रयत्नांचे शेतकऱ्यांनी कौतुक केले. जनजागृतीसाठी कृषी विज्ञान केंद्रांनी (KVK) घेतलेल्या भूमिकेचेही शेतकऱ्यांनी कौतुक केले. कृषी विज्ञान केंद्रांनी त्यांच्या लाभांबद्दलची  जागरूकता वाढवण्यासाठी दर महिन्याला विकसित केल्या जाणाऱ्या नवीन वाणांच्या फायद्यांविषयी शेतकऱ्यांना स्वयंस्फूर्तीने माहिती द्यावी, अशी सूचना पंतप्रधानांनी केली. या नवीन पिकांच्या वाणांच्या विकासाबद्दल पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांचीही प्रशंसा केली. वापरात नसलेली पिके मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनेनुसार आपण काम करत असल्याची माहिती शास्त्रज्ञांनी दिली....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

तूर घ्या आता तिन्ही हंगामांत

भाताच्या काढणीनंतर असणाऱ्या शेतातील ओलाव्यावरही तुरीची लागवड करता येते. भात काढणीनंतर लगेचच टोकण पद्धतीने त्या क्षेत्रात तुरीची लागवड केल्यास मशागतीचा खर्चही वाचतो. कमी खर्चात उपलब्ध...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

धूप कमी करण्यासाठी काजू, आंबा, नारळ लागवड

भारतीय कृषी संशोधन परिषदेकडून गोव्यातील प्रमुख पिकांमधील माती आणि पोषक तत्वांचे नुकसान यावर स्पष्टीकरण गोवा – भारतीय कृषी संशोधन परिषद – सेंट्रल कोस्टल अॅग्रिकल्चरल रिसर्च...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!