रुतला बाई काटा
रुतला बाई काटा सत्तेच्या आडवाटा
घड्याळाचा काटा आला जोडीला
आला जोडीला म्हणुन मी गेले मोडीला
आला जोडीला म्हणुन मी गेले मोडीला
कसा गोड बोलुनी तू काटा काढीला
गं बाई बाई बाई रुतला बाइ काटा
घड्याळाचा काटा आला जोडीला
आला जोडीला म्हणुन मी गेले मोडीला
कसा गोड बोलुनी तू काटा काढीला
गं बाई बाई बाई रुतला बाई काटा
कोण जाणे का माझ्यावर विट पडली
तीट तुझा होता रे पण भेट घडली
कोण जाणे का माझ्यावर विट पडली
तीट तुझा होता रे पण भेट घडली
मधुर संतापाचा रे तू स्वर छेडीला
मधुर संतापाचा रे तू स्वर छेडीला
गं बाई बाई बाई रुतला बाई काटा
सत्तेच्या आडवाटा
घड्याळाचा काटा होता जोडीला
आला जोडीला म्हणुन मी गेले मोडीला
कसा गोडं बोलुनी तू काटा काढीला
गं बाई बाई बाई रुतला बाइ काटा
बारामतीच्या दादा तुला म्हणु तरी काय
लाल दिव्यासाठी तू धरीला पाय
बारामतीच्या दादा तुला म्हणु तरी काय
लालादिव्यासाठी तू धरीला पाय
किती धिट तु, बाई तू पक्ष फोडीला
किती धिट तु, बाई तू पक्ष फोडीला
कसा गोड बोलुनी तू काटा काढीला
गं बाई बाई बाई रुतला बाई काटा
सत्तेच्या आडवाटा
घड्याळाचा काटा होता जोडीला
आला जोडीला म्हणुन मी गेले मोडीला
कसा गोडं बोलुनी तू काटा काढीला
गं बाई बाई बाई रुतला बाई काटा
अशी रे कशी ही तुझी दादागिरी
तुझा हर्ष होता रे मी झाले बावरी
अशी रे कशी ही तुझी दादागिरी
तुझा हर्ष होता रे मी झाले बावरी
जणु भाईगिरीचा रे तू घडा फोडीला
जणु भाईगिरीचा रे तू घडा फोडीला
कसा गोड बोलुनी तु काटा काढीला
गं बाई बाई बाई रुतला बाई काटा
सत्तेच्या आडवाटा
घड्याळाचा काटा आला जोडीला
आला जोडीला म्हणुन मी गेले मोडीला
कसा गोडं बोलुनी तू काटा काढीला
गं बाई बाई रुतला बाइ काटा
कवी – शिवाजी सातपुते ९०७५७०२७८९
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.