गोव्यातील जंगल क्षेत्रातील 40 वणव्यांवर थेट देखरेखकरण्यासाठी 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन
गोवा राज्यात मार्च, 2023 पासून जंगले, खाजगी क्षेत्रे, सार्वजनिक जमीनी ,बागा , महसुली जमीन इत्यादींसह विविध भागात अनेक ठिकाणी वनवे लागल्याचे आढळले आहे आणि त्यांची नोंद करण्यात आली आहे.
वणव्यांच्या या स्थानिक घटनांकडे सर्वोच्च प्राधान्याने लक्ष देण्यासाठी आणि त्यांची ठिकाणे सुनिश्चित करण्याच्या अनुषंगाने नैसर्गिक संसाधनांसह जीवित आणि मालमत्तेची किमान हानी सुनिश्चित करण्यासाठी ,मनुष्यबळ आणि साहित्याची जुळवाजुळव करण्याच्या दृष्टीने गोव्यातील वन विभागाने , जिल्हाधिकारी (उत्तर गोवा ), जिल्हाधिकारी (दक्षिण गोवा ), एसपी (उत्तर गोवा ), एसपी (दक्षिण गोवा ) आणि अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयासारख्या इतर विभागांशी समन्वय साधला आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना अतिदक्षता घेण्याचा इशारा देण्यात आला असून, परिस्थितीचा बारकाईने आढावा घेतला जात आहे आणि सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना वेळोवेळी आवश्यक सूचना दिल्या जात आहेत.
जंगलातील वणव्यांची परिस्थिती हाताळण्यासाठी वनविभागाने आत्तापर्यंत उचललेली पावले –
आगीवर प्रत्यक्ष लक्ष ठेवण्यासाठी 24 कार्यरत नियंत्रण कक्ष: एफएसआय विभागाच्या माध्यमातून निर्माण केलेल्या यंत्रणेद्वारे प्रत्यक्ष देखरेखीसाठी 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.आगीच्या घटनास्थळी ताबडतोब उपस्थित राहण्यासाठी अचूक भौगोलिक निर्देशांक आणि वणव्यांची ठिकाणे निश्चित करण्यासाठी अक्षांश रेखांकानुसार रियाल टाइम नकाशे क्षेत्रीय कार्यकर्त्यांना सामायिक केले जात आहेत .
आगीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभारी म्हणून वनक्षेत्र विभागांमध्ये विभागलेले उप वनसंरक्षक / सहाय्यक वन संरक्षक स्तरावरील अधिकारी नियुक्त: वणव्यांनी प्रभावित क्षेत्रे हे अनेक क्षेत्रांमध्ये विभागण्यात आली आहेत आणि डीसीएफ आणि एसीएफ स्तरावरील अधिकाऱ्यांना वणव्यांच्या घटनास्थळी तात्काळ उपस्थित राहण्यासाठी कर्तव्ये सोपवण्यात आली आहेत.750 हून अधिक लोक यासाठी कार्यरत आहेत.
वनक्षेत्रातील अनधिकृत प्रवेशांवर बंदी, प्रवेश रोखण्यासाठी वन आणि वन्यजीव कायद्यांची कडक अंमलबजावणी : वनक्षेत्रातील अनधिकृत प्रवेश तपासण्यासाठी आणि प्रतिबंधित करण्यासाठी, वन कायद्यांची सुनिश्चित आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी उपवन संरक्षकांना विशिष्ट निर्देश देखील देण्यात आले आहेत.
संबंधित विभागांशी समन्वय : आगीच्या घटनांचे युद्धपातळीवर तात्काळ व्यवस्थापन करण्यासाठी पीआरआयसह जिल्हाधिकारी (उत्तर)/(दक्षिण), पोलीस विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालय, स्थानिक समुदाय यांची संयुक्त पथके समन्वयाने तैनात आहेत.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन : जिल्हाधिकारी(उत्तर/दक्षिण ) पोलीस अधिक्षक(उत्तर/दक्षिण ) यांच्यासह (अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा) संचालक यांच्याबरोबर संवाद साधण्यात आला. तसंच त्यांच्या संबंधित अधिकारक्षेत्रातल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित कराव्यात आणि वनवे प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना त्याअनुषंगानं सूचना जारी करण्यात आल्या.
वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक आणि समाज माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचणं: जंगलातल्या वणव्याबद्दल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण करावी. प्रतिबंधात्मक आणि नियंत्रण उपायांबाबत काय करावं आणि काय करू नये याचा प्रसार करण्यात येत आहे .
प्रत्येक ठिकाणच्या वणव्यांची कारणं शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले: सर्व संबंधित DCF अर्थात उप वन संरक्षकाला 5 मार्च 2023 पासून झालेल्या प्रत्येक वणव्यांच्या घटनांची तपशीलवार चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जंगलातल्या वनवे प्रतिबंधक उपाययोजना गतीमान करण्यात आल्या: वणव्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी क्षेत्र अधिकारी आणि त्यांची पथकं अविरत प्रयत्न करत आहेत. जंगलातील पानगळ साफ केली जात आहे.
वणव्यांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी खबरदारीचा उपाययोजना: वणव्यांवर तात्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी त्यावर सातत्याने देखरेख केली जात आहे.
वणव्यांचे नियंत्रण आणिव्यवस्थापन यासाठी हवाई दल आणि नौदलाचे सहाय्य : हवाई दल आणि नौदलाचे दोन हेलिकॉप्टर राज्यभरात किती प्रमाणात वनवे लागले आहेत ते शोधण्यासाठी वनक्षेत्राचं नियमित हवाई निरीक्षण करत आहेत. सक्रिय वनव्यांचे क्षेत्र मोजण्यासाठी ड्रोनचा देखील वापर केला जात आहे. जिथे पोहचू शकत नाही, अशा दुर्गम भागातली आग विझवण्यासाठी भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदल हेलिबकेटचा वापर करत आहेत.
आगीच्या ठिकाणाहून प्राप्त झालेल्या अहवालांनुसार, 5 मार्च 2023 पासून 1,000 तासांत, 48 वनव्यांची ठिकाणं शोधून काढली आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अन्य विभागांसह स्थानिकांच्या समन्वयानं यात काम केलं.या वणव्यांमुळे जंगलातील वनस्पती आणि प्राणी यांच्या जैव विविधते संदर्भातील मोठ्या हानीची अद्यापपर्यंत नोंद नाही
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.