January 28, 2023
Tilganga Sahitya Prerana awards Peth Sangli
Home » तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार अन् प्रतिभा पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार अन् प्रतिभा पुरस्कार जाहीर

  • तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार आणि तिळगंगा प्रतिभा पुरस्कार जाहीर
  • वृषाली खैरनार, बाबा जाधव, अशोक भेलके व ऍड.शुभदा कुलकर्णी याना पुरस्कार.

पाचवे तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलन, पेठ पंचक्रोशी, पेठच्या वतीने २२ जानेवारी 2023 रोजी होत आहे. यानिमित्ताने यंदाच्या वर्षांपासून कथासंग्रह , कवितासंग्रह व कादंबरी या साहित्यप्रकारातील पहिल्या साहित्यकृतीला कवी -गझलकार विनायक कुलकर्णी पुरस्कृत स्व. गणपतराव शंकरराव कुलकर्णी (तात्या ) जवळेकर स्मृती तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात देण्याचा निर्णय घेण्यात असून या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

सन २०२२ साठी अनुक्रमे कवी बाबा जाधव ( रुई, जि. कोल्हापूर) यांना ‘ भूक ‘ ,या कवितासंग्रहासाठी , तसेच कादंबरीकार अशोक भेलके ( पुणे ) यांना ‘ पुण्य तोयम् ‘ या कादंबरीसाठी तर कथालेखिका वृषाली नरेंद्र खैरनार (साक्री जि. धुळे) यांना ‘ दुष्टचक्र ‘ या कथासंग्रहासाठी जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच ललित लेखसंग्रह व प्रवासवर्णन या साहित्य प्रकारासाठी प्रदान करण्यात येणारा प्रतिभा बुक्स, इस्लामपूर पुरस्कृत स्व. बाळासाहेब पाटील स्मृती तिळगंगा प्रतिभा पुरस्कार हा ऍड. सौ. शुभदा कुलकर्णी ( वडूज जि. सातारा )यांना ‘असोशीची भाषांतरे ‘ या ललित लेख संग्रहासाठी जाहीर करण्यात आलेला आहे.

२२ जानेवारी २०२३ रोजी पेठ जि. सांगली येथे होणाऱ्या पाचव्या तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती संमेलनाचे आयोजक ज्येष्ठ साहित्यिक मेहबूब जमादार, अध्यक्ष, तिळगंगा साहित्यरंग परिवार तसेच संगीत अलंकार पंडित लोहार, संगीतरत्न कै. ग. रा.पाटील संगीतमंच आणि ज्येष्ठ समाजसेवक सर्जेराव जाधव, अध्यक्ष, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्येष्ठ नागरिक सेवा संघ ,पेठ यांनी संयुक्तरित्या दिली आहे.

Related posts

बंद शाळा, परीक्षा अन् राजकीय अनास्था 

संत साहित्य पुरस्कार योजनेसाठी पुस्तके पाठवा

‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठी कविता संग्रह पाठवण्याचे आवाहन

Leave a Comment