December 5, 2024
The weather will be cold throughout the week
Home » आठवडाभर थंडीस वातावरण पूरकच
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आठवडाभर थंडीस वातावरण पूरकच

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२

आठवडाभर थंडीस वातावरण पूरकच

रविवार दि. १७ नोव्हेंबर पासून थंडीत हळूहळू होत असलेली वाढ अजूनही आठवडाभर टिकून असण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे आजपासुन पुढील आठवडाभर म्हणजे मंगळवार दि. २६ नोव्हेंबरपर्यन्त महाराष्ट्रात थंडीसाठी अटकाव करणारे कोणतेही वातावरण नसुन ह्या आठवड्यात आकाश निरभ्रतेतुन सकाळ-संध्याकाळी थंडीत अजुन अधिक वाढ होण्याची शक्यता जाणवते.

सध्या महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान ३१ तर पहाटेचे किमान तापमान १५ ते १६ डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान असुन ही दोन्हीही तापमाने हे जवळपास सरासरीपेक्षा एक ते दोन डिग्रीने खालावलेले आहेत.

मंगळवार दि. २६ नोव्हेंबरनंतर म्हणजे  आठवड्यानंतरही थंडीतील सातत्य हे टिकून असण्याची शक्यता ही आहेच, परंतु त्या संदर्भातील खुलासा त्यावेळच्या वातावरणीय अवस्थेनुसारच केलेले योग्य ठरेल, असे वाटते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading