ओळख औषधी वनस्पतींची यामध्ये आवळा या वनस्पतीबद्दल माहिती…
– सतिश कानवडे
संस्थापक,
औषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,
सावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर
मोबाईल 9850139011, 9834884804
वनस्पतीचे नाव- आवळा
वनस्पतीचे वर्णन–
युफोरबियेशी या वनस्पती कुळातील हा वृक्ष असून याच्या बहुरंगी गुणामुळे हा वृक्ष आयुर्वेदामध्ये फार लोकप्रिय आहे. हा वृक्ष ९ ते १२ मीटर उंच वाढतो. आवळा हे कोरडवाहू फळझाड अत्यंत काटक असून महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे वाढते.
औषधी उपयोग–
या वृक्षाच्या सालीचा ताजा रस+हळद+मध ग्र्मिव्र वापरतात. फळे रात्रभर पाण्यात ठेवून पाण्याने डोळे धुवावे. त्रिफळा चूर्ण (हरडा+बेहडा+आवळा) तयार करतात. थंडी, पडसे, रक्तशुद्धीकरीता, छातीचे विकार बरे होण्यासाठी उपयोगी. थकवा घालवण्यासाठी आवळा + पिवळी+ पळसखार+ मध+ तूप एकत्र करून रोज प्यावे. ताप, आमांश, कावीळ, प्रमेह, आम्लपित्त, हगवण व मधुमेहावर उपयुक्त. मोठ्या प्रमाणावर च्यवनप्राश बनविण्यासाठी वापर. माणसाचे आयुष्य वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
हवामान व जमीन–
फळ धारणेसाठी उबदार उष्ण व समशीतोष्ण हवामानाची आवश्यकता असते. पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत चांगली वाढ होते.
रोपे तयार करणे–
बिया किंवा कलमाद्वारे याची रोपे तयार करता येतात. बिया वाळून चोविस तास थंड पाण्यात भिजवून गादी वाफ्यावर पेरणी करावी. रोपे पिशवीत लावावीत.
लागवड–
रोपाची ७ बाय ७ मीटर अंतरावर लागवड करावी. त्यासाठी ३० बाय ३० बाय ३० सेमी आकाराचे खड्डे घेवून त्या मातीमध्ये २५ ग्रॅम स्फुरद, १० किलो पालाश, चांगले शेणखत आणि मिथेन मिसळून खडी भरून घ्यावे. पिशवीतील रोपांचा उपयोग करावा.
खते व पाणी व्यवस्थापन-
जमिनीच्या प्रकारानुसार पाणी द्यावे. झाडाच्या वयानुसार खतांची मात्रा वाढवावी. एका झाडाला पाच किलो शेणखत ५० ग्रॅम मिश्रण. नत्र खताची मात्रा दरवर्षी थोडी थोडी वाढवावी.
काढणी–
फळ धारणेपासून १८ ते २० आठवड्यात फळाची पूर्ण वाढ होते.
उत्पन्न–
साधारणपणे १० वर्षाच्या झाडाला ५० ते १५० किलो आवळा मिळतो.
बाजारभाव–
स्थानिक बाजारपेठेत आवळ्याला ३० ते ४० रुपये प्रतिकिलो आणि चूर्ण २५ रुपये प्रतिकिलो दर मिळतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.