मुलं मोठी झाल्यावर मात्र सारं काही विसरतात. त्यांना वाटतं आपल्या वडिलांनी आपल्याला नेहमी धाकात वाढवलं. रेल्वेतल्या म्हाताऱ्या आई-वडिलांचे अनुभव ऐकून डोळे ओलावतात. या ‘भूमी’ वर कुणाचाच लक्ष नव्हतं. मला मग मला उगीचच का भीती वाटावी??
रवी राजमाने, 7709999860
ravirajmane51@gmail.com.
ही आहे ‘भूमी’ उत्तर प्रदेशातील बलीया ची दीड दोन वर्षांची असावी. तिच्याबरोबर अजून एक तिच्याच वयाची मुलगी. रेल्वेच्या डब्यात बिनधास्त उड्या मारत होत्या. रेल्वेच्या दाराकडे पळाली की छातीत धस व्हायचं. तिच्या आई-बाबांच लक्ष नसायचं. मी एकदा ओरडलो. “अरे बच्ची को पकडो” मग तिचा बाप तिच्यामागे धावला. तो ही असाच आठ- दहा दिवस कपडे न धुतलेला, दाढी वाढवलेली, हातावर गोंदलेले, हातातल्या बँडवर महाकाल लिहिलेलं. कानात बाली.
त्याची बायकोही भांगात भरपूर सिंदूर घातलेली. भले मोठे दागिने. हातात भरगच्च बांगड्या. बाकड्यावर निवांत झोपलेली. पुन्हा मुलगी दाराकडे पळाली आमची संवेदनशीलता जागी. पुन्हा छातीत धस झालं. अरे यांना काही काळजी आहे की नाही? डेमोचे डबे जोडतात तिथं मोकळी स्पेस बरीचशी असते. रेल्वेची धडधड डब्यांच हलन.. भीती वाटायची. माझी त्या मुलीबद्दलची अस्वस्थता बघून तिची आई हसायची.
अरे यांना काहीच कस वाटत नाही? खायच्या वस्तू कशाही देतात ते घाणेरडे हात, कसेही लोळण घेतात. आरोग्याची काळजी नाही. बहुतेक यांना शिक्षणाचा गंधच नसावा. तरीही असं का वागतात.
‘भूमी’ इकडं तिकडं पळू नये म्हणून मी तिला “नाच रे! मोरा आंब्याच्या बनात”. हे गाणं लावून दिलं युट्युब वर बघत राहिली. हसत राहिली.
मला माझ्या मुलीचा बालपणीचा काळ आठवला. आम्हीही रेल्वेने प्रवास करायचो. पण कधी तिच्या पायाला माती लागू दिली नाही. रेल्वेच्या खिडकीला धरू दिल नाही. बिघडलेल्या सामाजिक वातावरणाचा फटका नको. म्हणून त्यांना सांभाळण्यासाठी थोडं बंधनात ठेवलं. कायम घाबरून राहिलो. आपल्या चिमणी -पाखरांना कुणाचा त्रास होऊ नये. म्हणून जीवापाड जपत राहिलो. बरेचसे पालक आपल्या मुलांच्यासाठी सर्वस्व अर्पण करतात.
मुलं मोठी झाल्यावर मात्र सारं काही विसरतात. त्यांना वाटतं आपल्या वडिलांनी आपल्याला नेहमी धाकात वाढवलं. रेल्वेतल्या म्हाताऱ्या आई-वडिलांचे अनुभव ऐकून डोळे ओलावतात. या ‘भूमी’ वर कुणाचाच लक्ष नव्हतं. मला मग मला उगीचच का भीती वाटावी?? कदाचित त्या छोट्या मुलीत मला माझी मुलगी दिसली असावी. लिहून गेलो. “आपके कोमल पैरो मे मिट्टी ना लगे हमने हथेली रख दि l आपको लगा हमने आपका बचपन छिन लिया l”
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.